IND vs WI 2nd Test Day 3: इशांत शर्माने आशिया खंडाबाहेर रचला इतिहास, कपिल देव यांचे विक्रम मोडीत
भारत विरुद्ध वेस्टइंडीज (indiaVsWestIndies) संघात सबिना पार्क (Sabina park),किंग्स्टन येथे दुसरा कसोटी सामना (2nd test) सुरु आहे. या सामन्यात वेस्ट इंडीजचा पहिला डाव 117 धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारतीय संघाने 299 धावांनी आघाडी घेतली आहे. या दरम्यान भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा (Ishant Sharma) याने भारतीय संघाचे माजी खेळाडू कपिल देव (Kapil dev) यांचा विक्रम मोडीत काढत आशियाखंडतील (Asia) सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा भारतीय ठरला आहे.
भारत विरुद्ध वेस्टइंडीज (indiaVsWestIndies) संघात सबिना पार्क (Sabina park),किंग्स्टन येथे दुसरा कसोटी सामना (2nd test) सुरु आहे. या सामन्यात वेस्ट इंडीजचा पहिला डाव 117 धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारतीय संघाने 299 धावांनी आघाडी घेतली आहे. या दरम्यान भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा (Ishant Sharma) याने भारतीय संघाचे माजी खेळाडू कपिल देव (Kapil dev) यांचा विक्रम मोडीत काढत आशियाखंडतील (Asia) सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा भारतीय ठरला आहे. या सामन्यात भारताकडून जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumraha) सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या आहेत, तर मोहम्मद शमीने (Mohhamad Shami) 2 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच इशांत शर्मा आणि रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.
भारत विरुद्ध वेस्टइंडीज कसोटी सामन्यात इशांत शर्माने वेस्टइंडीज संघाचा विकेटकीपर याला बाद केले होते. याचबरोबर इंशात शर्माने भारतीय संघाचा माजी खेळाडू कपिल देव यांचा विक्रम मोडीत काढला आहे. कपिल देव यांनी आशिया खंडाबाहेर 155 विकेट्स घेतल्या आहेत. वेस्टइंडीज सामन्या दरम्यान इशांतने 1 विकेट घेवून कपिल देव यांनी आशिया खंडाबाहेर घेतलेल्या 155 विकेट्सच्या विक्रमाला मागे टाकले आहे. हे देखील वाचा-IND vs WI 2nd Test Day 3: वेस्ट इंडिजवर टीम इंडिया भारी, स्टम्पपर्यंत भारताकडे 299 धावांची आघाडी
आशिया खंडाबाहेर सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्या एकूण भारतीय गोलंदाजांमध्ये माजी फिरकीपटू अनिल कुंबळे (Anil kumble) हे अव्वल स्थानावर आहे. अनिल कुंबळे यांनी आशिया खंडाबाहेर २०० विकेट्स घेतल्या आहेत. इशांत शर्मा आशियाबाहेर 200 विकेट्स घेणारा एकमेव भारतीय गोलंदाज आहे. सर्वाधिक कसोटी विकेट्स घेण्याच्या यादीत इशांत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
आशियाबाहेर सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाजांची यादी
200 – अनिल कुंबळे (Anil Kumble) (50 सामने)
156 – इशांत शर्मा (Ishant Sharma) (46 सामने)
155 – कपिल देव (Kapil Dev) (45 सामने)
147 – झहिर खान (Zahir Khan) (38 सामने)
123 – बिशनसिंग बेदी (Bishan Singh Bedi) (34 सामने)
117 – हरभजन सिंग (Harbhajan Singh) (32 सामने)
117 – जवागल श्रीनाथ (Javagal Srinath) (31 सामने)
(The above story first appeared on LatestLY on Sep 02, 2019 09:03 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

