भारत (India) आणि वेस्ट इंडीज (West Indies) यांच्यातील दुसरा कसोटी सामना जमैकाच्या सबिना पार्क येथे खेळला जात आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडीज संघाने तिसर्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 2 गडी गमावून 45 धावा केल्या. चौथ्या दिवशी भारताला विजयासाठी 8 विकेटची आवश्यकता होती. जॉन कॅम्पबेल (John Campbell) याने 16 आणि क्रेग ब्रेथवेट (Kraig Brathwaite) 3 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. डॅरेन ब्राव्हो 18 आणि शाहमार ब्रुक्स 04 धावांवर खेळत आहेत. तत्पूर्वी, वेस्ट इंडिजला पहिल्या डावात 117 धावा देऊन गोलंदाजी करूनही भारताने त्यांना फॉलोआन न देण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावांत भारतासाठी विहारी आणि अजिंक्य रहाणे यांनी शतकी भागीदारी केली आणि संघाला मोठी आघाडी मिळवून दिली. विहार आणि रहाणेने 111 धावांची भागीदारी केली. पहिल्या डावात 416 धावांची खेळी करणार्या भारताला पहिल्या डावाच्या जोरावर 299 धावांची आघाडी मिळाली. (जसप्रीत बुमराह याने हॅट्रिक घेवून रचला इतिहास; विराट कोहली याचे मानले आभार)
हनुमा विहारी (Hanuma Vihari) याच्या शतकानंतर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडिया मजबूत स्थितीत पोहचली आहे. तिसऱ्या दिवसांचा खेळ संपेपर्यंत भारताकडे 299 धावांची आघाडी आहे. तिसऱ्या दिवशाचा खेळ 7 बाद 87 धावांवरून पुढे गेला असता तिसऱ्या दिवशी पहिल्या षटकात विंडिजला 8वा धक्का बसला. कार्नवॉल 14 धावा करत बाद झाला. तर हॅमिल्टन 5 धावा करत बाद झाला. तिसऱ्या दिवशी विंडिजला केवळ 30 धावा करता आल्या. भारतासाठी बुमराहने 6, शमीने 2 तर, इशांत शर्माने एक विकेट घेतली.
दरम्यान, पहिल्या डावांत टीम इंडियासाठी विहारीचं शतक, विराट कोहली आणि इशांत शर्मा, मयंक अग्रवाल यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 416 धावा केल्या. विहारीने 111 धावा, कोहली 76 धावा, इशांतने 57 तर मयंकने 55 धावा केल्या. विंडीजसाठी कर्णधार जेसन होल्डर याने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. रहकीम कार्नवॉल याने 3 तर केमार रोच आणि कार्लोस ब्रेथवेट यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.