Virat Kohli-JaspritBumrah (photo credit: Getty Image)

IND vs WI 2nd Test 2019: भारत विरुद्ध वेस्टइंडीज (IND vs WI 2nd Test 2019) यांच्यात दुसऱ्या कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने त्याच्या करिअरची पहिली हॅट्रिक घेतली आहे. भारताकडून याआधी  कसोटी सामन्यात हरभजन सिंह (Harbhajan Singh) आणि इरफान पठान (Irfan Pathan) यांनी ही कामगिरी बजावली होती. सामन्या दरम्यान जसप्रीत बुमराहने सलग 2 विकेट घेतल्यानंतर रोस्टन चेज याला पायचीत केले. परंतु पंचाने चेजला नॉट ऑउट दिले. त्यावेळी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) निर्णय फायदेशीर ठरला. ज्यामुळे जसप्रीत बुमराहला कसोटी सामन्यात हॅट्रिक घेता आली आहे. यासाठी बुमराहने विराट कोहलीचे मनापासून अभार मानले आहे.

जसप्रीत बुमरहा याने त्याच्या खेळीने अनेकांना आकर्षित केले आहे. बुमराहने नेहमी भारतीय संघासाठी मोठे योगदान दिले आहे. भारत विरुद्ध वेस्टइंडीज यांच्यात दुसरा कसोटी क्रिकेट सामना खेळला जात आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहने हॅट्रिक घेवून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. परंतु, त्याच्या या कामगिरीचे श्रेय त्याने विराट कोहलीला दिले आहे. कारण, जसप्रीत बुमराहने सलग 2 चेंडूत ब्रावोला आणि शामरा ब्रुक्सला बाद केले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर बुमराहने रोस्टन रोच याला पायचीत केले. परंतु पंचानी रोस्टन रोचला नॉट ऑउट दिले. त्यावेळी विराट कोहली याने वेळ न घालवता डीआरएसचा वापर केला. त्यामुळे रोच ऑउट असल्याचे कळाले आणि भारतासाठी हॅट्रिक घेणारा बुमराह तिसरा गोलंदाज ठरला.हे देखील वाचा-IND vs WI 2nd Test Day 2: जसप्रीत बुमराह याचा भेदक मारा, वेस्ट इंडिज बॅकफूटवर; दुसऱ्या दिवशी विंडीजने गमावले 7 विकेट

इंटरव्ह्यू दरम्यान जसप्रीस बुमरहा म्हणाला की, त्याच्या या कामगिरीत कर्णधार विराट कोहलीचे मोठे योगदान आहे. "मी टाकलेला चेंडू रोचच्या बॅटला लागल्याचे मला वाटले. परंतु कर्णधार डीआरएस घेतला, यामुळे मला हॅट्रीक मिळाली. मी विराट कोहलीचे आभार मानतो", असे बुमरहा म्हणाला.