(Image Credit: AP/PTI Photo)

भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ने पुनः एकदा दमदार परी खेळत धावांचा डोंगर उभा केला आहे. कोहली ने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ला मागे सारत वनडे क्रिकेटमध्ये 11000 धावा पूर्ण धावा करण्याचा तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. कोहलीने 11 वर्षांहून कमी कालावधीत हा पल्ला गाठला शिवाय असं करणारा कोहली हा पहिलाच फलंदाज ठरला आहे. (IND vs PAK, ICC World Cup 2019: 23 वर्षांनंतर रोहित शर्मा-के एल राहुलच्या जोडीने मोडीत काढला तेंडुलकर-सिद्धूचा हा विश्वकप विक्रम)

दरम्यान, वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10000 धावा करण्याचा विक्रमही कोहलीच्या नावावर आहे. वनडे क्रिकेटमध्ये 11000 धावा करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी हा पल्ला पार केला होता.

सध्याच्या ICC गुणतालिकेत भारतीय संघ पाच गुणांसह तिसऱ्या, तर पाकिस्तान 3 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. भारताने आपले पहिले दोन्ही सामने जिंकला असून न्यूझीलंड विरुद्ध चा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.