भारताचा सलामीवीर शिकार धवन (Shikhar Dhawan) ने फादर्स डेच्या निमित्ताने सोशल मीडिया वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. एका कार्यक्रमाच्या चित्रीकरणादरम्यान शिखर त्याच्या मुलासोबत (Zoravar) दिसत आहे. या व्हिडिओमध्ये क्रिकेट खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) सुद्धा आहे. या दोंघांच्या उपस्थितीत सूत्रसंचालक गौरव कपूर (Gaurav Kapoor) शिखरच्या मुलाला एक प्रश्न विचारला आणि तो म्हणजे 'सर्वात चांगला फलंदाज कोण, तू की तुझे बाबा?'.
गौरवने विचारलेल्या या दोन्ही पर्यायांची तमा न बाळगता झोरावरने सर्वात चांगला फलंदाज रोहित असल्याचं म्हणत त्याच्याकडे इशारा केला. त्याचं हे उत्तर ऐकून शिखर, रोहित आणि गौरवला हसू आवरता आले नाही. हा व्हिडिओ शेअर करत शिखरने लिहिलं, 'बाप शेर तो बेटा सव्वाशेर'.
सध्या शिखर धवन हे दुखापतीमुळे विश्वकप मधील भारतीय संघातून बाहेर आहे. धवनला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यादरम्यान उजव्या बोटाला दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याला सक्तीची विश्रांती देण्यात आली आहे. सूत्रं प्रमाणे, धवन इंग्लंड विरुद्धच्या सामन्यासाठी संघात परतीचा प्रवास करू शकतो.