IND vs PAK, ICC World Cup 2019: पाकिस्तानी क्रिकेट प्रेमींचा नादच खुळा, सामना पाहण्यासाठी चक्क घोडेसवारी (Video)
Pakistani Cricket Lover (Photo Credits-Twitter)

IND vs PAK, ICC World Cup 2019: आज (16 जून) भारत (India) विरुद्ध पाकिस्तान (Pakistan) संघात सामना रंगणार आहे. तत्पूर्वी दोन्ही देशांच्या चाहत्यांध्ये उत्साह दिसून येत आहे. त्याचसोबत प्रत्येक क्रिकेटप्रेमी एका हटके अंदाजात आजच्या सामन्याचा उत्साह साजरा करताना दिसून येत आहे. तर पाकिस्तानी क्रिकेट प्रेमींचा नादच खुळा असल्याचा प्रत्यय येईल असा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

पाकिस्तानच्या संघासोबतचा भारताचा सामना आहे असे जरी म्हटले तरी सर्वांचे डोळे या बहुप्रतिक्षित सामन्याकडे लागलेले असते. तसेच क्रिकेटप्रेमींचे आपापल्या संघावरील प्रेम हे एका वेगळ्याच पद्धतीत उफाळून येत असते. तर सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाकिस्तान संघाला पाठिंबा दर्शवणाऱ्या एका चाहत्याने चक्क घोडेसवारी करत आजच्या सामन्याबद्दल त्याचा आनंद दर्शवला आहे. तसेच पाकिस्तान संघाचा झेंडा हातात घेत घोड्यावरुन राजासारखा विराजमान होत त्याने पाकिस्तानच्या संघाला प्रोत्साहन देताना दिसून येत आहे.

(IND vs PAK, ICC World Cup 2019 Live Streaming: भारत विरुद्ध पाकिस्तान लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर)

दोन्ही देशांसह जगभरातील क्रिकेट चाहते या सामन्यासाठी उत्सुक आहे. मात्र, या सामन्यावर पावसाचं सावट असल्याचं बोललं जात आहे. गेल्या आठवडाभरात विश्वकप स्पर्धेत चार सामने पावसामुळे रद्द करावे लागले आहेत. विश्वकपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना म्हटलं की प्रचंड तणाव आणि उत्सुकता. केवळ या दोन देशांतीलच नव्हे तर जगभरातील चाहत्यांसाठी हा सामना पर्वणीच असतो.