भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) संघ सातव्यांदा आयसीसी (ICC) विश्वासचाकात ग्रुप स्टेज सामन्यात आमने-सामने येणार. आजवर भारत-पाकिस्तान ६ वेळा विश्वासकप मध्ये भिडले मात्र एकदाही पाकिस्तानी संघ भारताला पराभूत करू शकलेला नाही. क्रिकेट विश्वातील या दोन पारंपारगत प्रतिस्पर्दीं मधील हा सामना रविवारी 16 जून ला मॅन्चेस्टर (Manchester) मधील ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियम (Old Trafford Stadium) वर खेळवला जाईल. (IND vs PAK, ICC World Cup 2019: 'हे युद्ध नाही'! भारत-पाक सामन्याआधी वसीम आक्रमच चाहत्यांना आव्हान)
दोन्ही देशांसह जगभरातील क्रिकेट चाहते या सामन्यासाठी उत्सुक आहे. मात्र, या सामन्यावर पावसाचं सावट असल्याचं बोललं जात आहे. गेल्या आठवडाभरात विश्वकप स्पर्धेत चार सामने पावसामुळे रद्द करावे लागले आहेत. विश्वकपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना म्हटलं की प्रचंड तणाव आणि उत्सुकता. केवळ या दोन देशांतीलच नव्हे तर जगभरातील चाहत्यांसाठी हा सामना पर्वणीच असतो.
भारत-पाकिस्तान या दोन्ही बलाढ्य संघात आज लढत होणार आहे. हा सामन्याचा लाईव्ह स्कोर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
तसंच वर्ल्डकप मधील भारत विरुद्ध पाकिस्तान संघाचा सामना तुम्ही ऑनलाइन HOTSTAR आणि STAR SPORTS वर पाहु शकता.
भारत विरुद्ध पाकिस्तान नाणेफेक:
Pakistan wins the toss and elect to bowl first against #TeamIndia pic.twitter.com/7XZkwH7YxR
— BCCI (@BCCI) June 16, 2019
असे असतील संघ:
भारत: विराट कोहली, रोहित शर्मा, के. एल राहुल, विजय शंकर, केदार जाधव, एम. एस धोनी, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युझवेन्द्र चहल, आणि जसप्रीत बुमराह.
पाकिस्तान: सर्फराज अहमद, बाबर आझम, इमाम उल हक, फखर जमान, मोहम्मद हाफिज, शादाब खान, शोएब मलिक, शादाब खान, हसन अली, वहाब रियाझ आणि मोहम्मद आमिर.