IND vs PAK, ICC World Cup 2019: पाकिस्तान ने टॉस जिंकला, पहिले गोलंदाजी करणार; विजय शंकर चा Debut

पाकिस्तान (Pakistan) ने टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात एकच बदल करण्यात आला आहे. संघात शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) जागी विजय शंकर (Vijay Shankar) ची वर्णी लागली आहे. शंकर पाकिस्तान होणाऱ्या सामन्यात चौथ्या स्थानी फलंदाजी करायला येईल तर के. एल. राहुल (KL Rahul) रोहित शर्मा (Rohit Sharma) सोबत सलामीला येणार. ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध सामन्यादरम्यान धवनला हाताला दुखापत झाल्याने त्याला काही सामन्यासाठी विश्रांती दिली आहे. (IND vs PAK, ICC World Cup 2019: पाकिस्तानी क्रिकेट प्रेमींचा नादच खुळा, सामना पाहण्यासाठी चक्क घोडेसवारी (Video)

दुसरीकडे, पाकिस्तानच्या संघात दोन बदल करण्यात आलेले आहे.

दरम्यान, हवामान खात्यानुसार भारत-पाक सामन्यवरही पावसाचे सावट आहे. भारत-पाक सामना हा मॅन्चेस्टर (Manchester) मधील ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) मैदानात खेळवला जाईल. गेले काही दिवस मॅन्चेस्टर मध्ये तुफान पाऊस पडला आहे. त्यामुळं आजचा हायवोल्टेज सामना रद्द ना व्हावा अशी चाहत्यांची इच्छा नाही आहे. भारत-पाकिस्तान सामना वेळेवर सुरु होणार आहे, मात्र हा सामना 50 षटकांचा होणार की नाही हे अद्याप निश्चित नाही. कारण सायंकाळी 5-7च्या सुमारास पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

असे आहे भारत-पाक संघ

भारत: विराट कोहली, रोहित शर्मा, के. एल राहुल, विजय शंकर, केदार जाधव, एम. एस धोनी, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युझवेन्द्र चहल, आणि जसप्रीत बुमराह.

पाकिस्तान: इमाम-उल हक, फखर झमान, बाबर आझम, मोहम्मद हाफिज, सर्फराज अहमद, शोएब मलिक, इमाद वासिम, शादाब खान, हसन अली, वहाब रियाझ, आणि मोहम्मद आमिर.