IND vs BAN 2nd T20I: युजवेंद्र चहल याचा प्रभावी मारा, टीम इंडियाला विजयासाठी 154 धावांचे लक्ष्य
भारत-बांगलादेश (Photo Credit: IANS)

राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) संघातील 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. या मॅचमध्ये टॉस जिंकून टीम इंडियाने पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत बांग्ला टायगर्सला 6 बाद 153 धावांवर रोखले. आता भारताला विजयासाठी 20 ओव्हरमध्ये 154 धावांची गरज आहे. बांग्लादेशकडून मोहम्मद नईम (Mohammad Naim) याने सर्वाधिक धावा केल्या. नईम 36 धावांवर बाद झाला, तर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. टॉस गमावल्यावर पहिले बॅटींग करत बांग्लादेशची सुरुवात चांगली झाली. सलामी फलंदाज लिटन दास (Liton Das) आणि नईमने पहिल्या विकेटसाठी 60 धावा केल्या. याच्यानंतर रिषभ पंत याने दासला धावबाद करत संघाला पहिले यश मिळवून दिले. यापूर्वी दिल्लीमध्ये झालेल्या मॅचमध्ये बांग्लादेशने 7 विकेटने विजय मिळवला होता आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली होती. (IND vs BAN 2nd T20I: रिषभ पंत याच्या चुकीच्या Stumping वर भडकले Netizens, झाली एम एस धोनी याची आठवण, पाहा Tweets)

बांग्लादेश संघाने पॉवरप्लेचा चांगला फायदा उठविला. दास आणि नईमने 6 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावत गमावता 54 धावा केल्या. यादरम्यान, पंतच्या चुकीमुळे भारताने हातातली विकेट गमावली. बांग्लादेशला दुसरा फटका नईमच्या रूपाने मिळाला. त्याने 36 धावा केल्या आणि वॉशिंग्टन सुंदर याच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यर याच्या हाती झेलबाद झाला. मागील सामन्यात बांग्लादेशच्या सामन्यात विजयाचा नायक मुशफिकुर रहीमया सामन्यात जास्त धावा करू शकला नाही आणि चार धावांवर झेलबाद झाला. चहलच्या चेंडूवर कृणाल पंड्या याने त्याचा अप्रतिम झेल पकडला. सौम्य सरकार चांगली फलंदाजी करीत होता आणि पंतच्या हाती चहलने त्याला 30 धावांवर झेलबाद केले. आफिफ हुसेन याच्या रुपाने भारताला पाचवी विकेट मिळाली. अफीफने 6 धावा केल्या.

टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत भारत आणि बांगलादेशचे संघ 9 वेळा आमने-सामने आले आहेत. भारताने बांग्लादेशला सलग 8 वेळा पराभूत केले, तर बांगलादेशने एकदा विजय मिळविला. हा सामना दिल्लीमध्ये खेळल्या गेलेल्या या मालिकेचा आहे. या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताला सात विकेटने पराभवाला सामोरे जावे लागले होते.