रिषभ पंत (Photo Credit: twitter)

टीम इंडियाचा युवा फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) पुन्हा एकदा सोशल मीडिया यूजर्सच्या निशाण्यावर आला आहे. भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) संघात 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळला जात आहे. या मॅचमध्ये टॉस जिंकून भारताने पहिले  बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. आजचा सामना भारतासाठी महत्वाचा आहे. बांग्लादेशने यापूर्वी झालेला पहिला सामना जिंकत मालिकेत 1-0 आघाडी मिळवली होती. त्यामुळे, भारतीय संघ सध्या मालिकेत बरोबरी साधण्याच्या प्रयत्नात आहे. आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल नाही झाला आहे. म्हणजेच, रिषभ पंतचे स्थान कायम आहे. पण, या मॅचच्या सुरुवातीलाच पंतच्या विकेटकिपिंगने सर्वांचे लक्ष वेधले. (IND vs BAN 2nd T20I: रोहित शर्मा याने दुसऱ्या टी-20 मॅचमध्ये केले ऐतिहासिक 'शतक', शाहिद आफ्रिदी ही राहिला मागे)

पॉवर प्लेनंतरच्या दुसऱ्या 8 व्या ओव्हर मध्ये पंतला स्टंपिंग करण्याची संधी होती, पण त्याने चुकीच्या तंत्राने गमावली. युजवेंद्र चहल याच्या गोलंदाजीवर कर्णधार रोहित शर्मा याने लिटन दास याचा झेल सोडला. त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवर पंतने दासला स्टॅम्पिंग करत माघारी धाडले. पण, थर्ड अंपायरने रिव्यू केल्यावर पंतची चूक नजरेत आली आणि फलंदाजाला जीवदान मिळाले. पंतने चेंडू स्टंपच्या पकडला आणि स्टॅम्पिंग केल्याचे थर्ड अंपायरला दिसून आले आणि त्यांनी नो -बॉल देत दासला जीवदान दिले. आणि मग काय यांच्यानंतर पंत पुन्हा एकदा नेटिझन्सच्या निशाण्यावर आला.

पाहा पंतच्या चुकीच्या स्टॅम्पिंगवर नेटिझन्सच्या प्रतिक्रिया:

याच्याकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोण विकेटकीपिंग करवत आहे

रिषभने स्टंपच्या पुढे झेल पकडला

प्रिय रिषभ पंत....

पंत इतका वाईट आहे की धोनीचे टीकाकारही त्याला मिस करत असतील

धोनी कृपया पंतचे मार्गदर्शन करा, विकेटकिपिंग कशी करावी

धोनीचे चाहते आणि ट्विटर सध्या

ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी लिट्टन दास 14 चेंडूंत 17 धावा करीत असताना बांगलादेशची धावसंख्या 44 होती. या घटनेनंतर टीम इंडियाचे खेळाडू खूप निराश झाले. विशेषत: पंतला त्याची चूक लक्षात आली आणि तो खूप निराश झाला. मात्र, नंतर या सामन्यात 29 धावांच्या स्कोरवर पंतने लिटन दास बाद केले.