IND vs BAN 2nd T20I: रोहित शर्मा याने दुसऱ्या टी-20 मॅचमध्ये केले ऐतिहासिक 'शतक', शाहिद आफ्रिदी ही राहिला मागे
रोहित शर्मा (Photo Credit: Getty Images)

भारतीय संघाचा (Indian Team) सध्याचा कर्णधार आणि सलामी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) याने आज राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर बांग्लादेश (Bangladesh) विरूद्ध मैदानात उतरताच एक भारतीय क्रिकेटसाठी ऐतिहासिक कामगिरी करत शतकाची नोंद केली आहे. या शतकासह रोहित जगातील दुसरा, तर भारताचा पहिला क्रिकेटपटू बनला आहे. बांग्लादेशविरुद्ध आजचा सामना रोहितचा टी-20 मधील 100 वा सामना आहे. क्रिकेटच्या सर्वात छोट्या स्वरूपात 100 सामने खेळणारा रोहित जगातील दुसरा क्रिकेटपटू बनला आहे. पाकिस्तानी संघाचा माजी अष्टपैलू शोएब मालिक (Shoaib Malik) याने आजवर सर्वाधिक 111 टी-20 सामने खेळला आहेत. यासह त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) यालाही पिछाडीवर टाकले. आफ्रिदी 99 टी-20 सामने खेळल्यानंतर निवृत्ती जाहीर केली. भारताकडून सर्वाधिक टी-20 सामने खेळणारा पहिला फलंदाज बनला आहे. (IND vs BAN 2nd T20I: टॉस जिंकून भारताचा बॉलिंगचा निर्णय, पहा कसा आहे भारत-बांग्लादेशचा Playing XI)

राजकोटमध्ये बांग्लादेशविरुद्ध दुसर्‍या टी-20 सामन्याआधी बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यात रोहित आपल्या प्रवासाविषयी सांगत आहे. रोहित म्हणतो की त्याचा प्रवास खूपच अस्थिर होता. तो संघात आत-बाहेर राहिला, पण कठोर परिश्रम करण्यास कधीही विसरला नाही. रोहित म्हणाला, “मला असे कधीही वाटले नव्हते की मी इतके सामने खेळेन. आजपर्यंत, ज्याने मला संधी दिल्या आहेत, त्यांचे मी आभार मानू इच्छितो. 2007 मध्ये पदार्पण केल्यापासून माझा आजपर्यंतचा प्रवास खूपच अस्थिर होता. या अनुभवातून मी बरेच काही शिकलो आहे. मी भारतासाठी माझा 100 वा सामना खेळणार आहे, मला खूप छान आणि अभिमान वाटतो." दरम्यान, भारतडकून 100 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळणारा रोहित दुसरा क्रिकेटपटू आहे. यापूर्वी हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिने दक्षिण आफ्रिका (South Africa) महिला संघाविरुद्ध 100 वा टी-20 सामना खेळत या विक्रमाची नोंद केली होती.

कसोटी क्रिकेटमध्ये सलामी फलंदाज म्हणून आपला दुसरा डाव सुरू करणाऱ्या रोहितने क्रिकेटच्या या स्वरुपात सर्वाधिक 4 शतकं केली आहेत. शिवाय, सध्या टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे. बांगलादेशविरुद्ध रोहितने पहिल्या सामन्यात 9 धावा करत कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला पिछाडीवर टाकत हा पराक्रम केला होता. रोहितने 99 टी-20 सामन्यात 2452 धावा केल्या आहेत.