भारत-बांगलादेश (Photo Credit: IANS)

बांगलादेश (Bangladesh) विरुद्ध दुसऱ्या टी-20 मॅचमध्ये टॉस जिंकून भारताचा (India) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जाणारा आजचा सामना टीम इंडियासाठी महत्वाचा आहे. आजचा सामने जिंकणे भारतासाठी गरजेचे आहे. यापूर्वी झालेल्या सामन्यात बांगलादेशने 7 विकेटने विजय मिळवला होता आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली होती. त्यामुळे, मालिकेत आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय मिळवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. आजच्या या सामन्यात भारतीय संघात कोणताही बदल नाही करण्यात आला आहे. राजकोटमध्ये भारतीय संघ मालिका बरोबरीत करण्याचा प्रयत्न करेल, तर बांग्लादेश संघ ऐतिहासिक मालिका विजय नोंदवण्याच्या निर्धारित असेल. (IND vs BAN 2nd T20I 2019 Live Score Updates)

पहिला टी -20 सामना दिल्लीमध्ये खेळविण्यात आला असून दोन्ही संघांना हवेच्या प्रदूषणाचा सामना करावा लागला. यावेळी बांग्लादेश संघाने मुखवटा घालून सराव सत्रात भाग घेतला होता. दिल्ली टी-20 मध्ये खराब फलंदाजी आणि खराब क्षेत्ररक्षणामुळे भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. टी-20 मध्ये हा बांग्लादेशविरुद्ध भारतीय संघाचा पहिला पराभव होता. भारत-बांग्लादेश लाईव्ह पाहा आमच्या यूट्यूब चॅनेलवर इथे

असा आहे भारत-बांग्लादेशचा प्लेयिंग इलेव्हन

टीम इंडिया: रोहित शर्मा (कॅप्टन), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (विकेटकीपर), क्रुणाल पंड्या, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, दीपक चहर आणि खलील अहमद.

बांग्लादेश:  सौम्या सरकार, लिंटन दास, मोहम्मद नईम, मुश्फिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमुदुल्ला (कॅप्टन), मोसद्देक हुसेन, आफिफ हुसेन, मोसद्देक हुसैन, अमीनुल इस्लाम, सैफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान आणि अल-अमीन-हुसेन.