रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने बांग्लादेशविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात विकेटने विजयाची नोंद केली आहे. यासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे. भारताने 8 विकेटने विजयाची नोंद केली. आता दोन्ही संघातील मालिकेचा निर्णय नागपूरमध्ये 10 नोव्हेंबरला होईल. 

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याचे पाचवे टी-२० शतक हुकले. अमिनुल इस्लाम याच्या गोलंदाजीवर 85 धावांवर रोहित बाद झाला. रोहितने आज 6 चौकार आणि 6 षटकार लगावत संघाला विजयाच्या जवळ नेले. 

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याचे पाचवे टी-२० शतक हुकले. अमिनुल इस्लाम याच्या गोलंदाजीवर 85 धावांवर रोहित बाद झाला. रोहितने आज 6 चौकार आणि 6 षटकार लगावत संघाला विजयाच्या जवळ नेले. 

भारतीय संघाचा सलामी फलंदाज शिखर धवन अमीनुल इस्लाम याच्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात बोल्ड झाला. धवनने आज 27 चेंडूंचा सामना केला आणि चार चौकारांच्या मदतीने 31 धावा केल्या.

भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्माने चमकदार फलंदाजी करत टी -20 क्रिकेट कारकीर्दीचे 18 वे अर्धशतक पूर्ण केले आहे. या खेळीदरम्यान शर्माने 23 चेंडूंचा सामना करत 6 चौकार आणि तीन षटकार ठोकले. शर्मा सध्या 53 धावांवर खेळत आहे.

टीम इंडियाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी संघाला वेगवान सुरुवात करून दिली. दोन्ही फलंदाज बांग्लादेशी गोलंदाजांसमोर सावधपणे खेळत आहे. दोघे संधी शोधत चौकार आणि षटकार ठोकत आहे. 

बांग्लादेशने दिलेल्या 154 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा केल्या. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी भारताकडून डावाची सुरुवात केली. 

प्रथम फलंदाजी करताना बांग्लादेश संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 153 धावा केल्या आहेत. अशाप्रकारे, भारताला विजयासाठी 154 धावांचे लक्ष्य मिळाले आहेत. 

कर्णधार महदुल्लाह याच्या रूपात बांग्लादेशला सहावा धक्का,महदुल्लाहने दीपक चाहर याच्या गोलंदाजीवर चुकीचा शॉट मारला आणि 30 धावांवर बाद झाला.

आफिफ हुसेनने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण रोहित शर्माने चांगला झेल घेतला. अफीफने 6 धावा केल्या. 

Load More

राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (Saurashtra Cricket Association) स्टेडियमवर आज भारत (India) आणि बांगलादेश (Bangladesh) यांच्यात एक महत्त्वाचा सामना खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात तीन सामन्यांच्या मालिकेचा निकाल निश्चित होणार आहे. बांग्लादेश संघाने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आजच्या मॅचमध्ये टीम इंडियासमोर करो या मरो सारखी स्थिती आहे. आजचा सामना जिंकणे भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहे अन्यथा तो मालिका गमावून बसेल, त्यामुळे, आता भारत हा सामना जिंकून मालिकेट बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. या मॅचदरम्यान पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. या सामन्यावर 'महा' (Maha) चक्रीवादळाचे सावट होते, परंतु सकाळी मिळालेल्या माहितीनुसार चक्रीवादळ कमकुवत झाले आहे आणि सामना दरम्यान पावसाची शक्यता आहे पण त्याचा त्याचा फारसा परिणाम होणार नाही. (सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

पहिल्या सामन्यात भारतीय खेळाडूंचे प्रदर्शन समाधानकारक राहिले नाही. फलंदाजी आणि अन्य क्षेत्रात त्यांना पराभव कामगिरी करता आली नाही. शिवाय, दरवेळी प्रमाणे भारताची मध्यम क्रमाला अजून किती परिणामकारक कामगिरी करायचे आहे हे दिसून आले. कर्णधार विराट कोहली याची अनुपस्थिती जाणवून आली. युवा फलंदाज श्रेयस अय्यर, के एल राहुल आणि रिषभ पंत चांगला खेळ करू शकले नाही. त्यामुळे, आजच्या सामन्यात भारतीय संघात काही बदल होतात की नाही यावर सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.

भारताचा टी -20 संघ: रोहित शर्मा (कॅप्टन), शिखर धवन, केएल राहुल, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, क्रुणाल पंड्या, युजवेंद्र चहल, राहुल चहर, दीपक चहर, खलील अहमद, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर.