File Image of Shikhar Dhawan (Photo Credits: Getty)

दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) सारख्या  बलाढ्य संघाना पराभूत केलेल्या भारतीय (India) संघाला मोठा धक्का बसलेला आहे. भारताचा डावखुरा सलामीवीर शिखर धवनला (Shikhar Dhawan) 3 आठवड्यांसाठी संघांतून बाहेर करण्यात आले आहे. धवनला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना अंगठ्याला दुखापत झाली होती. दुखापतीमुळे तो क्षेत्ररक्षणालाही येऊ शकला नव्हता. आता धवन बाहेर पडल्यामुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) सोबत सलामीला कोण येणार याची जोरदार चर्चा सोशल मीडियाकार सुरु झाली आहे. (ICC World Cup 2019: Team India ला मोठा धक्का, शिखर धवन दुखपतीने भारतीय संघातुन बाहेर)

चाहत्यांनी धवनच्या दुखापतीबद्दल दुःख व्यक्त केले तर काहींनी Twitter वर  रिषभ पंतचा (Rishabh Pant) चा Team India मध्ये समावेश करण्याची मागणी केली. काही जणांनी दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि विजय शंकर (Vijay Shankar) यांचाही संघात समावेश करण्याचे म्हटले आहे. कार्तिक आणि शंकर आधीपासूनच भारतीय विश्वचषक संघाचा एक भाग आहेत परंतु त्यांचा प्लेयिंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केल नाही.

भारताने आपले विश्वकप मधले पहिले दोन्ही सामने जिंकले आहे अँड विजयाची हॅटट्रिक मारण्याच्या इच्छेने भारतीय संघ न्यूझीलंडशी (New Zealand) दोन हात करतील.