Shikhar Dhawan (Photo Credits: Twitter/ BCCI)

न्यूझीलंड सामन्य आधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसलेला आहे कारणऑस्ट्रेलिया विरोधात दमदार शतक ठोकनारा सलामीवीर शिखर धवनला दुखपतीमुळे भारतीय संघातून 3 आठवड्यांसाठी बाहेर करण्यात आले आहे. धवनला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यादरम्यान उजव्या अंगठ्याला दुखापत झाली होती आणि त्यामुळे तो क्षेत्ररक्षणालाही  दिसला नाही. (ICC World Cup 2019: Team India ची चिंता वाढली, हा सलामीवीर न्यूझीलँडच्या सामन्याला मुकणार?)

शिखरच्या जागी के. एल. राहुल ला रोहित शर्मा सोबत सलामीला येइची संधी मिळू शकते. राहुल सोबतच विजय शंकरची हि संघात वर्णी लागू शकते. शंकर भारतीय संघात 4 थ्या स्थानावर खेळू शकतो.

भारतीय संघ 13 जूनला आपला विश्वकपमधील तिसरा सामना खेळेल. विराट संघ ICC गुणतालिकेत तिसऱ्या, तर न्यूझीलंड अव्वल स्थानावर आहे. जर भारताने आपला तिसरा सामना जिंकला तर तो गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेऊ शकतो.