ICC World Cup 2019: Team India ची चिंता वाढली, हा सलामीवीर न्यूझीलंडच्या सामन्याला मुकणार?
Team India (Photo Credits: IANS)

आपल्या पहिल्या दोन्ही सामन्यात विजयी सलामी दिल्यावर, भारतीय संघ (Team India) आपली विजयी घोडदौड कायम ठेवण्याच्या तयारीत आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया जशा संघाचा पराभव केल्यानंतर, भारतीय संघाचा सामना आता गुणतालिकेत अव्वलस्थानी बसलेल्या न्यूझीलंडशी होईल. पण सामन्याआधीच विराटची चिंता वाढण्याची चिन्ह दिसत आहे कारण ऑस्टर्लिया विरोधात दमदार शतक करणारा सलामीवीर शिखर धवन न्यूझीलंड विरोधात खेळणार की नाही याबाबत सस्पेन्स कायम आहे. (IND vs AUS, ICC Cricket World Cup 2019: ऑस्ट्रेलिया वर टीम इंडिया ची 36 धावांनी विजय; शिखर धवन ठरला 'मॅन ऑफ द मॅच')

धवनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यादरम्यान उजव्या अंगठ्याला दुखापत झाली होती आणि त्यामुळे तो क्षेत्ररक्षणालाही  दिसला नाही. स्कॅन दरम्यान धावांच्या अंगठ्याला सूज आल्याचे स्पष्ट झाले आणि भारतीय संघाचे फिजीओ पैट्रीक फरहार्ट गुरूवारी न्यूझीलँड विरोधात धवन खेळणार की नाही याबाबत लवकरच खुलासा करतील.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजी करताना जलद गोलंदाज कुल्टर नाईलचा चेंडू धवनच्या अंगठ्याला लागला होता. दरम्यान, जर धवन न्यूझीलँड विरोधात खेळला नाही तर, विजय शंकरची संघात वर्णी लागू शकते आणि  के. एल राहुल रोहित शर्मा सोबत सलामीला येऊ शकतो.