ENG vs AUS, ICC CWC 2019 Semi-Final: ऑस्ट्रेलिया आऊट! इंग्लंडचा 8 विकेट्सने विजय, फायनलमध्ये न्यूझीलंडशी भिडणार
(Photo by Michael Steele/Getty Images)

आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकाच्या दुसऱ्या सेमीफाइनलमध्ये गतजेते ऑस्ट्रेलिया (Australia) संघाचा 8 विकेट्स ने धुव्वा उडवत यजमान इंग्लंड (England) संघाने विश्वकपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. इंग्लंडसाठी सलामीवीर जेसन रॉय याने सर्वाधिक 85 धावा केल्या तर जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) याने 34 धावा केल्या. रॉय आणि बेअरस्टो यांनी 124 धावांची भागिदारी करून भक्कम सुरूवात केली. जेसन रॉयनं 85 धावा करून महत्त्वाची भूमिका पार पाडली. तर जॉनी बेअरस्टोनं दुसऱ्या बाजुने सावध खेळी करत त्याला साथ दिली.  (ENG vs AUS, CWC 2019 Semi-Final: ग्लेन मॅग्राथ याचा मोठा विक्रम मोडत मिचेल स्टार्क ने एका विश्वचषकमध्ये घेतल्या सर्वाधिक विकेट्स)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयासह इंग्लंडचा संघ फायनलमध्ये न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध भिडेल. इंग्लंड संघ 1992 नंतर पहिल्यांदा फायनलमध्ये पोहचला आहे. या विजयासह यंदा क्रिकेट जगताला नवा जग्गजेता मिळणार आहे.  बेअरस्टो मिशेल स्टार्क याच्या गोलंदाजीवर पायचित झाल्यावर जो रूट आणि कर्णधार इयॉन मॉर्गन यांनी संघाला विजय मिळवून दिला.

दरम्यान, टॉस जिंकून फलंदाजी करत ऑस्ट्रेलिया ने इंग्लंडसमोर जिंकण्यासाठी 224 धावांचे लक्ष दिले आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांनी पहिल्या चेंडूपासून ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर दबाव टाकला. ऑस्ट्रेलियासाठी माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) याने एकाकी लढा दिला. मिशेल स्टार्स (Mitchell Starc) ने स्मिथला चांगली साथ दिली . स्मिथने 119 चेंडूत 85 धावा केल्या तर स्टार्कने 36 चेंडूत 29 धावा केल्या. स्मिथ आणि स्टार्क यांना वगळता दुसऱ्या कोणाही खेळाडूला चांगली फलंदाजी करणे जमले नाही.

गेल्या 12 सामन्यातील इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियावर भारी पपडला आहे. 12 सामन्यांपैकी 10 सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला आहे.