Hockey World Cup 2018: हॉकी विश्वचषकाचे धुमशान उद्यापासून (बुधवार, २८नोव्हेंबर) सुरु होत आहे. हॉकी विश्वचषकाचे हे १४वे पर्व आहे. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथून या स्पर्धेला सुरुवात होईल. यजमान भारतीय संघाची टीम ग्रुप सी बेल्जियम, कनाडा आणि दक्षिण अफ्रिकेसोबत आहे. या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय टीम दक्षिण अफ्रिकेसोबत आपला पहिला सामना खेळेळ. या वेळी कर्णधार म्हणून विश्वचषकासाठी संघाची धुरा मनप्रीत सिंह याच्या खांद्यावर आहे. तर, चिंगलेनसाना सिंह संघाची उपकर्णधार आहे. अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या या स्पर्धेचे वेळापत्रक (Hockey World Cup Schedule) तुम्ही इथे पाहू शकता.
हॉकी विश्वचषक २०१८ वेळापत्रक
28 नव्हेंबर 2018
सायंकाळी 5 वाजता : बेल्जियम विरुद्ध कॅनडा (ग्रुप सी)
सायंकाळी 7 वाजता: भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका (ग्रुप सी)
29 नोव्हेंबर 2018
सायंकाळी ५ वाजता: अर्जेंटीना विरुद्ध स्पेन (ग्रुप ए)
सायंकाळी 7 वाजता: न्यूजीलॅंड विरुद्ध फ्रान्स (ग्रुप ए)
30 नोव्हेंबर 2018
सायंकाळी 5 वाजता: ऑस्ट्रेलिया विरुद्ध आयर्लंड (ग्रुप बी)
सायंकाळी 7 वाजता: इंग्लंड विरुद्ध चीन (ग्रुप बी)
(हेही वाचा, भारताची बॉक्सर Mary Kom ने रचला इतिहास; 6 सुवर्णपदके प्राप्त करण्याचा जागतिक विक्रम)
1 डिसेंबर 2018
सायंकाळी 5 वाजता: नेदरलँड विरुद्ध मलेशिया (ग्रुप डी)
सायंकाळी 7 वाजता: जर्मनी विरुद्ध पाकिस्तान (ग्रुप डी)
2 डिसेंबर 2018
सायंकाळी 5 वाजता: कॅनडा विरुद्ध साऊथ अफ्रीका (ग्रुप सी1)
सायंकाळी 7 वाजता : भारत विरुद्ध बेल्जियम (ग्रुप सी)
3डिसेंबर 2018
सायंकाळी 5 वाजता: स्पोन विरुद्ध फ्रान्स (ग्रुप ए)
सायंकाळी 7 वाजता: न्युजीलंड विरुद्ध अर्जेंटीना (ग्रुप ए)
4 डिसेंबर 2018
सायंकाळी 5 वाजता: इग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (ग्रुप बी)
सायंकाळी 7 वाजता: आयर्लंड विरुद्ध चीन (ग्रुप बी)
5 डिसेंबर 2018
सायंकाळी 5 वाजता: जर्मनी विरुद्ध नेदरलँड (ग्रुप डी)
सायंकाळी 7 वाजता: मलेशिया विरुद्ध पाकिस्तान (ग्रुप डी)
6 डिसेंबर 2018
सायंकाळी 5 वाजता: स्पेन विरुद्ध न्यूजीलंड (ग्रुप ए)
सायंकाळी 7 वाजता: अर्जेंटीना विरुद्ध फ्रान्स (ग्रुप ए)
7डिसेंबर 2018
सायंकाळी 5 वाजता: ऑस्ट्रेलिया विरुद्ध चीन (ग्रुप बी)
सायंकाळी 7 वाजता: आयर्लंड विरुद्ध इंग्लंड (ग्रुप बी)
8 डिसेंबर 2018
सायंकाळी 5 वाजता: बेल्जियम विरुद्ध दक्षिण अफ्रिका (ग्रुप सी)
सायंकाळी 7 वाजता: कॅनडा विरुद्ध भारत (ग्रुप सी)
9 डिसेंबर 2018
सायंकाळी 5 वाजता: मलेशिया विरुद्ध जर्मनी (ग्रुप डी)
सायंकाळी 7 वाजता: नेदरलँड विरुद्ध पाकिस्तान (ग्रुप डी)
क्रॉस ओव्हर
10 डिसेंबर 2018
सायंकाळी 4 वाजून 45 मिनिटांनी: ग्रुप ए (2nd)विरुद्ध ग्रुप बी (3rd) (25)
सायंकाळी 7 वाजता: ग्रुप बी (2nd) विरुद्ध ग्रुप ए (3rd) (26)
11 डिसेंबर 2018
सायंकाळी 4 वाजून 45 मिनिटांनी: ग्रुप सी (2nd) विरुद्ध ग्रुप डी (3rd) (27)
सायंकाळी 7 वाजता:सायंकाळी 4 वाजून 45 मिनिटांनी ग्रुप डी (2nd) विरुद्ध ग्रुप सी (3rd) (28)
क्वॉर्टर फाइनल
12 डिसेंबर, 2018
सायंकाळी 4 वाजून 45 मिनिटांनी: ग्रुप ए (1st) विरुद्ध विजेता संघ 26 (29)
सायंकाळी 7 वाजता: ग्रुप बी (1st) विरुद्ध विजेता संघ 25 (30)
13 डिसेंबर, 2018
सायंकाळी 4 वाजून 45 मिनिटांनी: ग्रुप सी (1st) विरुद्ध विजेता संघ 28 (31)
सायंकाळी 7 वाजता: ग्रुप डी (1st) विरुद्ध विजेता संघ 27 (32)
15 डिसेंबर, 2018 (सेमीफाइनल)
सायंकाळी 4 वाजून 45 मिनिटांनी: विजेता संघ 29 विरुद्ध विजेता संघ 32
सायंकाळी 7 वाजता: विजेता संघ 30 विरुद्ध विजेता संघ 31
16 डिसेंबर 2018 (ब्रॉन्ज मेडल)
सायंकाळी 4 वाजून 45 मिनिटांनी: पराभूत संघ (33) विरुद्ध पराभूत संघ (34)
सायंकाळी 7 वाजता: (फाइनल) विजेता संघ 33 विरुद्ध विजेता संघ 34
आतापर्यंतचा इतिहास पाहता १९७५चा अपवाद वगळता भारताला एकदाही विश्वचषक जिंकता आला नाही. त्यामुळे या वेळी विजयी लक्ष्य गाठण्यासाठीच भारत मैदानात उतरेल. तसेच, यंदाच्या विश्वचषकावर भारताचे नाव कोरले जाईल अशी आशा तमाम हॉकीप्रेमींना आहे. या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी होतील.