हरभजन सिंह ने व्हिडिओ शेअर केलेला व्हिडिओ (Photo Credit: Instagram)

भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंह (Harbhajan Singh) या लॉकडाउन (Lockdown) दरम्यान सोशल मीडियावर अधिक सक्रिय झाला आहे. लॉकडाउनमध्ये घरात कैद झाल्याने अनेक बोर होत आहेत आणि सोशल मीडियावर मजेदार व्हिडिओ, फोटो शेअर करून आपला वेळ घालवत आहेत. हरभजनही सोशल मीडियावर मजेदार व्हिडिओ आणि मिम्स शेअर करत आहेत, ज्यांना यूजर्सकडून पसंत केले गेले आहेत. यावेळी हरभजनने असा व्हिडिओ शेअर केला आहे, तो पाहून तुम्ही नक्की हसून-हसून लोटपोट व्हाल. त्याने या व्हिडिओमध्ये भारताला सलामी फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) याला टॅग केले. या व्हिडिओमध्ये महिला मुलाला कडेवर घेऊन कचरा टाकण्यासाठी गेली. पण कचऱ्याऐवजी तिने मुलाला डस्टबिनमध्ये ठेवले. नंतर जेव्हा तिला आठवलं, तेव्हा ती मुलाला घ्यायला पळाली. हा मजेदार व्हिडिओ सामायिक करताना भज्जीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "हद्द आहे... हे पाहिल्यानंतर मला शिखर धवनची आठवण आली. आपल्या मित्रास टॅग करा जो करू शकतो."

भज्जीच्या या व्हिडिओवर 'गब्बर' शिखरने मजेदार प्रतिक्रिया दिली. धवन यांनी लिहिले,"मलिक हात जोडले. आयशा माझी स्थिती अधिक वाईट करेल." धवनची प्रतिक्रिया पाहून भज्जीलाही हसून अनावर झाले. पाहा हा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

Hadh hai 😂😂 jattaaa this reminds me of you @shikhardofficial tag ur friend who is like this 😂

A post shared by Harbhajan Turbanator Singh (@harbhajan3) on

'गब्बर'ची प्रतिक्रिया

भज्जीसह धवन देखील सोशल मीडियावर अधिक सक्रिय झाला आहे. हास्यास्पद व्हिडिओसह धवनने कुटुंबासोबतचे अनेक व्हिडिओ आणि फोटोज शेअर केले आहेत. धवनने नुकतंच जुना फोटो शेअर केला ज्यात तो स्टायलिश असलायचं म्हणाला. धवनने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक झकास गॉगल लावलेला जुना फोटो शेअर केला. 'तेव्हा मी कूल होतो' असे कॅप्शन देऊन शिखरने फोटो शेअर केला. शिवाय, पूर्वी त्याने क्वारंटाइन लुक देखील शेअर केला होता. या चित्रात धवन डोक्यावर गमछा परिधान करताना मिशांना ताव देताना दिसत आहे. हा फोटो भज्जीलाही पसंत पडला आणि कमेंट करून त्याने धवनला नवीन टोपण नाव देऊन टाकले.