दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन (DDCA) आपला पुढील अध्यक्ष 13 जानेवारीपर्यंत निवडण्याची शक्यता आहे. यापूर्वी रजत शर्मा (Rajat Sharma) यांनी डीडीसीएच्या अध्यक्षपदावरून राजीनामा दिला होत आणि तेव्हापासून हे पद रिक्त आहे. आयएनएसच्या वृत्तानुसार, जर सर्व काही निश्चित रणनीतीनुसार चालत असेल तर भारताचे माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांना हे पद सांभाळण्यास सांगितले जाऊ शकते. डीडीसीए पुन्हा मार्गावर येण्याचा प्रयत्न करीत आहे आणि गंभीरला हे काम यशस्वीरीत्या पार पाडता येईल, असे अधिकाऱ्यांना वाटते. डीडीसीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "कोलकाता नाईट रायडर्सला दोनदा आयपीएलचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या कर्णधाराशी चर्चा झाली आहे. गंभीर हा कर्णधार होता आणि त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा अनुभवही आहे, ज्यामुळे डीडीसीएला पुन्हा रुळावर आणण्यासाठी त्याची मदत होईल." (DDCA च्या मीटिंगमध्ये पदाधिकाऱ्यांमधील हाणामारीवर भडकलेल्या गौतम गंभीर याने BCCI कडे केली बोर्डला Dissolve करण्याची मागणी)
ते म्हणाले, "तो काय करू शकतो हे सांगितले आहे. त्याने नाईट रायडर्सचे भविष्य बदलले. दिल्ली क्रिकेटमधील त्यांचे योगदान विसरता येणार नाही. आम्ही पाहिले आहे की बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी प्रशासक म्हणून आपली नेतृत्व क्षमता कशी पार पडली आहे. तसेच, आम्हाला वाटते की डीडीसीएसाठी यावेळी गंभीर ही योग्य निवड आहे." दरम्यान, रविवारी डीडीसीएच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अधिकाऱ्यांमध्ये भांडण झाले, त्यानंतर गंभीर यांनी ट्विट करून राग व्यक्त केला.
डीडीसीएच्या एजीएममध्ये गोंधळ उडाला. दोन गटांमधील वाद इतका वाढला कि अक्षरशः प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. या बैठकीत व्यासपीठावरील अधिकाऱ्यांनी एकमेकांवर आरोप केले, ज्याचे रूपांतरनंतर भांडणात झाले. या प्रकरणावर गंभीरने ट्विटरवर पोस्ट शेअर करत खंत व्यक्त करत डीडीसीए त्वरित विघटन करण्याची मागणी केली.