DDCA च्या मीटिंगमध्ये पदाधिकाऱ्यांमधील हाणामारीवर भडकलेल्या गौतम गंभीर याने BCCI कडे केली बोर्डला Dissolve करण्याची मागणी
DDCA मध्ये भांडण (संग्रहित संपादित प्रतिमा)

टीम इंडियाचा माजी सलामी फलंदाज गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने रविवारी बीसीसीआयकडे दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन (DDCA) विघटन करण्याची आणि वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान भांडणात सहभागी असलेल्या राज्य संघटनेच्या अधिकाऱ्यांवर बंदी घालण्याची मागणी केली. डीडीसीएने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की सर्व सदस्यांनी सर्व ठराव एकमताने मंजूर केले पण या वादाचा भाग असलेल्या क्रिकेट असोसिएशनच्या सूत्रांनी सांगितले की एजीएमने नाट्यमय परिस्थिती पाहायला मिळाली. या बैठकीत गोंधळ उडाला आणि सत्ताधारी गटाचे सहसचिव राजन मनचंदा यांनीही विरोधी पक्षाच्या मकसूद आलम याला चापड मारली. यासर्व घटनेवर भाजप खासदार गंभीरने ट्विटरद्वारे खंत व्यक्त केले आणि एजीएम दरम्यान झालेल्या या घटनेला लाजिरवाणे म्हटले. (भारतीय क्रिकेट विश्वातील लाजिरवाणी गोष्ट; DDCA च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पदाधिकाऱ्यांची हाणामारी Video)

गंभीर ट्विट करत म्हणाला की, "डीडीसीएने निर्लज्जपणे सर्व मर्यादा ओलांडल्या. काही असामाजिक घटक एखाद्या संस्थेची थट्टा कसे करतात ते पहा. मी बीसीसीआय, सौरव गांगुली, जय शाह यांना डीडीसीए त्वरित विघटन करण्याची मागणी करतो. निश्चितच या घटनेत सामील असलेल्या लोकांना शिक्षा किंवा आजीवन बंदी घालण्यात यावी." रविवारी झालेल्या डीडीसीएच्या बैठकीत असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले आणि त्यानंतर परिस्थिती बिघडत गेली आणि प्रकरण हाणामारीपर्यंत गेले.

याशिवाय, मंगळ महिन्यात रजत शर्मा यांनी डीडीसीए अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. शर्मा यांनी कोणत्याही किंमतीवर आपल्या ईमानदारी तडजोड करणार नाही, असे सांगून हे पद सोडले होते. यामुळे, डीडीसीएबाबत अनेक शंका उपस्थित झाल्या. गेल्या वर्षी जुलैमध्ये शर्मा यांनी माजी क्रिकेटपटू मदन लाल यांना, 517 मतांनी पराभूत करून पद प्राप्त केले होते. 20 महिन्यांचा त्यांचा हा कार्यकाळ अनेक चढउतारांनी भरलेला होता. यादरम्यान, सरचिटणीस विनोद तिहाडा यांच्याशी असलेले त्यांचे मतभेदही लोकांसमोर आले होते. दरम्यान, शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर डीडीसीएचे अध्यक्षपद अजूनही रिकामे आहे.