
Zimbabwe National Cricket Team vs Ireland National Cricket Team, 2nd ODI Match 2025 Scorecard: झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि आयर्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजे 16 फेब्रुवारी रोजी खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना हरारे (Harare) येथील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये (Harare Sports Club) खेळला जात आहे. मालिकेतील (ODI Series) पहिल्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वे संघाने आयर्लंडचा 49 धावांनी पराभव केला. यासह झिम्बाब्वेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक मालिका अपेक्षित आहे. या मालिकेत झिम्बाब्वेचे नेतृत्व क्रेग एर्विन (Craig Ervine) करत आहे. तर आयर्लंडचे नेतृत्व पॉल स्टर्लिंगकडे (Paul Stirling) आहे.
पाहा सामन्याचे स्कोअरकार्ड -
Zimbabwe have set Ireland a target of 246 in the second ODI. 🎯#ZIMvIRE#Travel&ExperienceZimbabwe 📝: https://t.co/pomiG0B7OYpic.twitter.com/wvKvPJVvIw
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) February 16, 2025
पहिल्या एकदिवसीय सामन्यात, आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर झिम्बाब्वे प्रथम फलंदाजी करायला आला पण त्यांची सुरुवात निराशाजनक झाली कारण दोन फलंदाज फक्त 47 धावा असताना बाद झाले. संपूर्ण झिम्बाब्वे संघ 49 षटकांत फक्त 245 धावांवर ऑलआउट झाले. झिम्बाब्वेकडून स्टार फलंदाज वेस्ली माधेवरे यांनी 61 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, वेस्ली माधेवरेने 70 चेंडूत सहा चौकार मारले. वेस्ली मधवेरे व्यतिरिक्त, अनुभवी अष्टपैलू खेळाडू सिकंदरने 58 धावा केल्या.
दुसरीकडे, मार्क अडायरने आयर्लंड संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. आयर्लंडकडून मार्क अदायरने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. मार्क अडायर व्यतिरिक्त, कर्टिस कॅम्फरने तीन विकेट्स घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी .
पहिल्या डावातील धावफलक:
झिम्बाब्वे फलंदाजी: 245/10, 49 षटकांत (ब्रायन बेनेट 30 धावा, बेन करन 18 धावा, क्रेग एर्विन 4 धावा, वेस्ली माधेवेरे 61 धावा, सिकंदर रझा 58 धावा, जोनाथन कॅम्पबेल 2 धावा, तादिवानाशे मारुमानी 0 धावा, वेलिंग्टन मसाकादझा 35 धावा, रिचर्ड नगारावा 17 धावा नाबाद, ट्रेवर ग्वांडू 2 धावा आणि ब्लेसिंग मुझाराबानी 0 धावा.)
आयर्लंड गोलंदाजी: (मार्क अडायर 4 बळी, ग्रॅहम ह्यूम 1 बळी, जोशुआ लिटल 1 बळी, अँडी मॅकब्राइन 1 बळी आणि कर्टिस कॅम्फर 3 बळी).