'तुम्ही कोणाला गर्ल्रफ्रेंड म्हणून निवडाल?' सवाल विचारात युवराज सिंहने शेअर केला टीम इंडियाचा व्हायरल Gender-swap फोटो, भुवनेश्वर कुमारने मारली बाजी (See Comments)
युवराज सिंहने शेअर केला टीम इंडियाचा Gender-swap फोटो (Photo Credit: Instagram/Facebook)

मागील काही महिने भारतातील प्रत्येकासाठी थोडे कठीण होते. करोना व्हायरसचा दणका क्रिकेट विश्वाला बसला आहे. इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) आयोजन लांबणीवर ढकलण्यात आले आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व क्रिकेटपटू घरात कैद झाले आहेत, त्यामुळे आपला कंटाळा घालवण्यासाठी क्रिकेटपटू विविध गोष्टी करत आहेत. भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याने काही दिवसांपूर्वी रोहित शर्माचा मुलीच्या रुपातला एक फोटो पोस्ट केला होता. त्यानंतर अनेक खेळाडूंचा महिला वेषातील फोटो प्रचंड व्हायरल झाला आणि तो फोटो माजी 'सिक्सर-किंग' युवराज सिंह (Yuvraj Singh) याने शेअर केला आणि तुम्ही कोणाला गर्ल्रफ्रेंड म्हणून निवडाल? असा सवाल केला. अलीकडे, आम्ही एक अतिशय मजेदार लिंग-स्वॅपिंग अॅप (Gender-Swap App) लोकप्रिय झाले आहे. याच्या मदतीने आपण एखाद्या मुलाचा चेहरा मुलीच्या रूपात बदलू शकता. युवराजने एक फोटो अपलोड केला ज्यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, रविचंद्रन अश्विन, एमएस धोनी, रवींद्र जडेजा, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अजिंक्य रहाणे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांच्या महिला रूपांचा समावेश आहे. (Yuzvendra Chahal trolls 'Rohita Sharmaa': युजवेंद्र चहलने मजेदार फोटोसह रोहित शर्माला केले ट्रोल; कलाकृतीवर नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया)

युवराजने फोटो अपलोड केल्यानंतर त्यावर क्रिकेटर आणि बॉलिवूड सेलिब्रिटिंनी हास्यास्पद प्रतिक्रिया दिली. बरेच खेळाडू दाढीशिवाय खूपच सुंदर दिसत असले तरी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार लोकप्रिय निवड म्हणून उदयास आला. ऑफ स्पिनर हरभजन सिंगने लिहिले की, “मी भुवीची निवड करेन.” पाहा युवीने शेअर केलेला फोटो:

 

View this post on Instagram

 

Who will you select as your 👯‍♀️ girlfriend’? 🤔🤣 I will reply tomorrow 🤪

A post shared by Yuvraj Singh (@yuvisofficial) on

"भूवी इज द हॉटेस्ट !!" बॉलिवूड अभिनेता आशिष चौधरीने लिहिले.

अभिनेता करण वाहीनेही ‘माझे मत भुवीला’ अशी प्रतिक्रिया दिली.

स्वत: भुवनेश्वर कुमारनेही “मी भुवीला निवडतो” अशी टिप्पणी केली.

या ट्रेंडची सुरुवात युजवेंद्र चहलने रोहित शर्माचा फोटो शेअर करून केली. चहलने रोहितच्याच चेहऱ्यावर एडीट करून महिलेचा चेहरा बनवला. त्या फोटोवर चहलने ‘रोहिता शर्मा भावा, तू खूप क्युट दिसतोयस’, असे कॅप्शनदेखील लिहिले.