Yuzvendra Chahal trolls 'Rohita Sharmaa': युजवेंद्र चहलने मजेदार फोटोसह रोहित शर्माला केले ट्रोल; कलाकृतीवर नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया
युजवेंद्र चहलने रोहित शर्माला केले ट्रोल (Photo Credit: Twitter/Instagram)

भारतीय लेगस्पिनर युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर अनेक व्हिडिओ पोस्ट करून आपल्या चाहत्यांना व्यस्त ठेवले आहे. लॉकडाऊनमध्ये चहलने अनेक लाइव्ह इंस्टाग्राम सत्रे घेतली आणि इतरांच्या लाइव्ह चॅटमधेही आपली उपस्थिती जाणवून दिली आहे. चहल, त्याच्या मस्तीखोर स्वभावासाठी ओळखला जातो आणि त्याचा तोच अंदाज पुन्हा एकदा सिद्ध केला. चहल आणि टीम इंडियाचा सलामी फलंदाज रोहित शर्माच्या (Rohit Sharma) मस्तीचे अनेक किस्से आपण ऐकली आहेत. दोघे एकमेकांची अनेकदा खिल्ली उडवताना पहिले गेले आहेत. बुधवारी चहलने सोशल मीडियावर मुंबईच्या फलंदाजाला ट्रोल करण्यासाठी हास्यास्पद पोस्ट शेअर केली आणि हा फोटो पाहून तुम्हालाही हसू फुटेल. चहलने फोटोमध्ये रोहितला मुलगी बंगल्याचं दिसतंय आणि नेटिझन्स देखील त्याच्या या कृतीमध्ये सामील झाले असून प्रत्येकाने भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. (युजवेंद्र चहल याने कतरीना कैफच्या लाईव्ह चॅटमध्ये घेतली एंट्री, पाहा व्हायरल मेसेज)

फोटो शेअर करताना चहलने कॅप्शनमध्ये लिहिले,"किती गोंडस दिसतोय तू रोहिता शर्मा भावा..." पाहा चहलची पोस्ट:

पाहा यूजर्सच्या प्रतिक्रिया:

रोहित शर्मा

फोटो पाहिल्यावर रोहित शर्मा

टिकटॉक यूजर्स

हाहाहा... 

दरम्यान, चहलने काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेत्री कतरीना कैफच्या लाइव्ह इंस्टाग्राम सत्रामध्ये कमेंट करून सर्वांना धक्का दिला होता. कतरीना लाइव्ह सत्रात शारीरिक तंदुरुस्तीवर बोलत असताना चहलने मधेच मेसेज केला आणि लिहिले, "हाय कतरीना मॅम". त्यावरून रोहितने चहलची फिरकी घेतली होती आणि चहलनेही खेळाडूवृत्तीने प्रतिसाद दिला होता. शिवाय, चहलने अनुष्का शर्माच्याही एका व्हिडिओवरही मजेदार टिप्पणी केली होती. अनुष्काने लॉकडाऊनमध्ये विराट कोहलीला 'चौक मार ना'... असे म्हणत छेडण्याचा प्रयत्न करत होती. यावर चहलने कमेंट केली आणि पुढच्या वेळी चहलला सलामीला पाठव अशी इच्छा विराटकडे व्यक्त करण्यास सांगितले होते.