Video: ऑकलंड टी-20 सामन्यात शार्दुल ठाकूर आणि कॉलिन मुनरो यांची खेळपट्टीवर झाली टक्कर, किवी फलंदाजाच्या Rugby कौशल्याचे Twitter वर कौतुक
शार्दुल ठाकूर आणि कॉलिन मुनरो (Photo Credit: Twitter)

ऑकलंडच्या (Auckland) ईडन पार्क येथे खेळल्या जाणार्‍या मालिकेच्या दुसर्‍या टी-20 सामन्यात भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) आमने-सामने आहेत. टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर किवींसाठी मार्टिन गप्टिल आणि कॉलिन मुनरो (Colin Munro) यांनी डावाची सुरुवात केली. सलामी जोडीने सावध सुरुवात केली असली तरीही नंतर त्यांना मोठा स्कोर करण्यात यश आले नाही. दोन्ही संघात चुरशीचा सामना पाहायला मिळत आहे आणि ऑकलंडमध्ये आधीच झालेल्या तणावपूर्ण प्रकरणात अतिरिक्त उत्साह वाढला होता जेव्हा शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि मुनरोची खेळपट्टीवर टक्कर झाली. मुनरो एक धाव घेताना शार्दूल खेळपट्टीचा मध्ये आहे आणि त्याची मुनरोसह टक्कर झाली. क्रिकेटच्या मैदानावर आपण खेळाडूंना चेंडू लाथ मारून फुटबॉल खेळताना पाहिले आहे, पण आज मुनरोने रग्बी कौशल्य दाखविले. (IND vz NZ 2nd T20I: न्यूझीलंडचे भारतीय गोलंदाजांसमोर लोटांगण, टीम इंडियासमोर 133 धावांचे लक्ष्य)

दुसऱ्या टी-20 सामन्याच्या किवी डावाच्या पॉवर प्लेच्या अंतिम षटकात शार्दुल आणि मुनरो एकमेकांशी भिडले. भारतीय गोलंदाजाने टाकलेला चेंडू मुनरोच्या अंगावर आदळल्याने तो चुकला आणि ऑफ साईडवर गेला. हे सर्व सहाव्या षटकांच्या दुसऱ्या चेंडूवर झाले जेव्हा मुनरोने एक धाव घेण्याचा प्रयत्न केलं आणि ठाकूरने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा दोघांमध्ये टक्कर झाली. मुनरोने धावा पूर्ण करण्यासाठी धावत राहिला, धडक लागल्यावर ठाकूर जमिनीवर बसला. पाहा हा मुनरोचे रग्बी कौशल्य:

मुनरो आणि शार्दूलमधील या टक्करची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. पाह नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया:

ऑकलंडमधील रेसलमेनिया लाइव्ह

चांगली स्पर्धा

शार्दुल ठाकूर विरुद्ध कॉलिन मुनरो

ठाकूर मुनरो रग्बी

गुप्टिलने 33 धावांच्या खेळी दरम्यान चार चौकार आणि दोन षटकार मार्के, मुनरोने दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 26 धावा केल्या. तथापि, पहिल्या विकेटसाठी 48 धावांची मोठी भागीदारी असूनही यजमानांनी त्वरित चार गडी गमावल्यामुळे डावाचा मार्ग गमावला.