IND vz NZ 2nd T20I: न्यूझीलंडचे भारतीय गोलंदाजांसमोर लोटांगण, टीम इंडियासमोर 133 धावांचे लक्ष्य
विराट कोहली, केन विल्यमसन

5 सामन्यांच्या टी-20 मालिकेचा दुसरा सामना भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात ऑकलँडच्या ईडन पार्क येथे खेळला जात आहे. या सामन्यात टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत किवी संघाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये बाद 5 धावा 132 केल्या आणि टीम इंडियासमोर 133 धावांचे लक्ष्य ठेवले. ऑकलँडमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताकडून रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने 2, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजांनी आपला दबाव कायम ठेवला होता. टीम इंडियाच्या गोलंदाजांविरुद्ध किवी फलंदाजांनी अक्षरशः लोटांगण घातले. किवींकडून सलामी फलंदाज मार्टिन गप्टिल (Martin Guptill) 33, कॉलिन मुनरो 26 धावा करून बाद झाले. कर्णधार केनने 14 धावा केल्या. रॉस टेलरने 18 धावा केल्या. टिम सेफर्ट 33 आणि मिशेल सॅंटनर 0 धावांवर नाबाद परतले. यापूर्वी, याच मैदानावर झालेल्या पहिल्या सामान्यत 6 विकेटने विजय मिळवून भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. (2021 टी-20 वर्ल्ड कपवर बहिष्कार घालण्याबाबत PCB चा घुमजाव, मुख्य कार्यकारी अधिकारी वासिम खान फेटाळलून लावले वृत्त)

नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने पहिले फलंदाजीस सुरुवात केली. सलामी जोडी मार्टिन गप्टिल आणि कॉलिन मुनरो यांनी माफक सुरुवात दिली. पहिल्या पॉवरप्लेमध्ये दोघांनी 48 धावा केल्या पण गप्टिल सहाव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर बाद झाला. शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर गप्टिल 20 चेंडूंत 33 धावा करून विराट कोहलीकडे कॅच आऊट झाला. कोलिन मुनरो याच्या रूपात यजमान संघाला दुसरा धक्का बसला. मुनरो शिवम दुबेच्या चेंडूवर 26 धावांवर विराटच्या हाती झेलबाद झाला. मागील सामन्याप्रमाणेच रवींद्र जडेजाने या सामन्यातही किवी संघाचा अष्टपैलू कॉलिन डी ग्रैंडहोम याला फिरकीच्या जाळ्यात अडकवले. डिग्रॅंडोमने 3 धावा केल्या आणि जडेजाच्या हाती झेलबाद झाला. जडेजाने पुढच्या षटकात किवी कर्णधार केन विल्यमसनला 14 धावांवर पॅव्हिलिअनचा मार्ग दाखवला.विल्यमसनयुजवेंद्र चहलकडे झेलबाद झाला.

5 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दोन्ही संघ कोणतेही बदल न करता मैदानावर उतरले आहेत. यापूर्वी 24 जानेवारी रोजी झालेला पहिला सामना त्याच मैदानावर खेळला गेला होता, जो भारतीय संघाने जिंकला होता आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आणि आता दुसरा सामना जिंकून भारतीय संघ देशवासियांना प्रजासत्ताक दिनाची भेट देऊन किवी संघावर वर्चस्व कायम ठेवू पाहिलं.