नवज्योत सिद्धू यांनी सांगितला 1988 मधील सचिन तेंडुलकरचा 'तो' किस्सा, यामुळे म्हटले जाते क्रिकेटचा देव

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हा जगातील सर्वांत नामांकित आणि एकमेव असा खेळाडू आहे की ज्याची पूजा देखील केली जाते, ज्याला क्रिकेटचा देव समजले जाते. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये आणि कसोटी क्रिकेट सामन्यांमध्ये सर्वात जास्त शतक बनवणाऱ्या तसेच सर्वात जास्त धावा काढणारे यादीमध्ये सचिन अग्रस्थानी आहे. कसोटी क्रिकेट सामन्यांच्या इतिहासातील सचिन तेंडुलकर हा पहिला आणि एकमेव खेळाडू आहे ज्याने पन्नास शतके केली आहेत. मात्र, त्याला क्रिकेटचा देव का म्हटले जाते? याचे एक उदाहरण माजी खेळाडू नवज्योत सिंह सिद्धूने (Navjot Singh Sidhu) एका कार्यक्रमात दिले आहे.

द प्रिंटच्या ऑफ द कप विथ शेखर गुप्ता या कार्यक्रमात नवज्योत सिंह यांनी हजेरी लावली होती. या त्यांना सचिन तेंडूलकर यांच्या कामगिरीबद्दल भाष्य केले आहे. तसेच त्याला क्रिकेट देव का म्हटले जात? याचेही त्यांनी एक चांगले असे उदाहरण दिले आहे. दरम्यान ते म्हणाले की, 1988 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध खेळण्यात आलेल्या एका सामन्यात धावपट्टी पूर्णपणे ओली होती. यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचे ठरवले होते. मात्र, नाणेफेक वेस्ट इंडीजने जिंकले आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी नवज्योत सिंह सिद्धू आणि सचिन तेंडूलकर सलामी देण्यासाठी मैदानात गेले. परंतु, धावपट्टी ओली असल्यामुळे नवज्योत सिंह सिद्धू यांना कर्ली एम्ब्रोस गोलंदाजीवर खेळण्यास अडचण येत होती. महत्वाचे म्हणजे, त्या पहिल्या षटकातला एकही बॉल त्यांच्या बॅटला न लागता शरिरावर आदळले होते. षटक संपल्यानंतर त्यानी सचिन तेंडूलकरला बॉल टप्पा पडल्यावर खेळण्यास अडचण येत असल्याचे सांगितले. मात्र, दुसऱ्या षटकात फलंदाजी करण्यास गेलेला सचिन तेंडूलकरने इयान बिशपला पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. त्यावेळी सचिनने चांगली खेळी केली. धावपट्टी ओली असतानाही सचिन चांगली खेळी करत होता. हे पाहून मला आश्चर्य वाटले. त्यानंतर मी त्याले विचारले तर, तो मला असा म्हणाला की, बॉल टप्पा पडताच हालचाल करतोय, हे तूच मला सांगितले. यामुळे बॉलचा टप्पा पडण्याआधीच मी बॉल कनेक्ट करत आहे, असे त्याने सांगितले. यामुळेच सर्व जग त्याला क्रिकेटचा देव म्हणून संबोधतो, हे त्याचे कारणे आहेत. हे देखील वाचा- Vijay Hazare Trophy 2021: अर्जुन तेंडुलकरला मोठा झटका; मुंबईच्या संघात मिळाले नाही स्थान

व्हिडिओ-

सचिन हा जागतिक क्रिकेटमधील एक महान फलंदाज आहे. त्याच्या नावावरती अनेक विक्रम नोंदवले गेलेले आहेत. त्याचा संयम आणि क्रिकेटची तंत्र याचे गुण सारे क्रिकेट जग गाते. सचिन तेंडुलकर हा फक्त फक्त त्याच्या विक्रमासाठी नव्हे तर त्याच्या विनम्र वागणुकी साठी, स्पोर्ट्समनशिप साठी सुद्धा ओळखला जातो.