KL Rahul (Photo Credit - Twitter)

IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाला 2-1 ने पराभवाचा सामना करावा लागला. भारताने पहिले दोन सामने जिंकल्यानंतर अखेरच्या एकदिवसीय सामन्यात यजमान संघाचा 227 धावांनी पराभव केला. या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर टीम इंडियाने (Team India) वनडे क्रिकेटमधील तिसरी सर्वोच्च धावसंख्या केली. टीम इंडियाने प्रथम खेळताना इशान किशनच्या (Ishan Kishan) 210 आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) 113 धावांच्या शानदार खेळीमुळे 8 विकेट गमावत 409 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 410 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 34 षटकांत 182 धावांवर गारद झाला. या सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) मोठे वक्तव्य केले आहे.

राहुलने केले मोठे वक्तव्य

बांगलादेशविरुद्धच्या द्विशतकाबद्दल राहुलने इशान किशनचे कौतुक केले आणि त्याने त्याच्या संधीचे सोने केले. या विजयामुळे 14 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढेल, असे राहुल म्हणाला. नियमित कर्णधार रोहित शर्माच्या दुखापतीमुळे संघात सामील झालेल्या किशनने 126 चेंडूत द्विशतक पूर्ण करून नवा विक्रम केला. सामन्यानंतर राहुल म्हणाला, “आमच्या संघाकडून ही अपेक्षा होती. विराट (कोहली) आणि ईशानने आमच्यासाठी स्टेज सेट केला. (हे देखील वाचा: WTC Final: वेस्ट इंडिजला पायदळी तुडवल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा मार्ग सोपा, जाणून घ्या काय आहेत भारतासाठी समीकरणे)

या विजयामुळे संघाला खूप आत्मविश्वास मिळेल

राहुल पुढे म्हणाला, “त्याने डावाची सुरुवात कशी केली हे स्कोअर सांगत नाही. ईशानने ही संधी दोन्ही हातांनी पकडली. त्याने शानदार फलंदाजी केली.” इशानसोबतच्या 290 धावांच्या भागीदारीदरम्यान मार्गदर्शकाची भूमिका बजावल्याबद्दल राहुलने कोहलीचे कौतुकही केले. तो म्हणाला, “विराटने त्याच्या अनुभवाने त्याला उत्तम मार्गदर्शन केले.” या विजयामुळे संघाला खूप आत्मविश्वास मिळेल, असा राहुलचा विश्वास आहे. तो म्हणाला, “संघाच्या या कामगिरीने मी खूप खूश आहे. आम्ही एक संघ म्हणून शिकत आहोत. अजूनही चांगले होण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या दोन सामन्यांचे निकाल आमच्या बाजूने लागले नाहीत हे आमचे दुर्दैव होते. या विजयातून आम्ही कसोटी मालिकेसाठी आत्मविश्वास वाढवू इच्छितो.