
WTC Final: ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज (AUS vs WI) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना अॅडलेडमध्ये खेळवण्यात आला. या डे नाईट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने पाहुण्या संघाचा 419 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने आजपर्यंत एकही डे नाईट कसोटी सामना न गमावण्याचा विक्रम कायम ठेवला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (WTC) जाण्याचा दावा पक्का केला. या शर्यतीत ऑस्ट्रेलियाशिवाय भारत (IND), दक्षिण आफ्रिका (SA) आणि पाकिस्तान (PAK) हे संघ आहेत. दोन सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवून ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले आहे.
फायनलमध्ये भारतासाठी कठीण रस्ता
या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा विजय टीम इंडियासाठी कठीण झाला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जाण्यासाठी भारताला आगामी सर्व कसोटी सामने जिंकावे लागतील. भारतीय संघाला बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामने आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात चार कसोटी सामने खेळायचे आहेत. या सर्व सामन्यांमध्ये केवळ एक विजय टीम इंडियाला थेट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये नेऊ शकतो. (हे देखील वाचा: पाकिस्तानचा पराभवानंतर WTC Points Table मध्ये मोठा फेरबदल; Team India ला फायदा, घ्या जाणून)
न्यूझीलंडकडून झाला होता पराभव
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचा रस्ता भारतासाठी सोपा नसेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अनिर्णित राहणे भारतीय संघासाठी अडचणीचे ठरू शकते. भारताने गेल्या वर्षीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. जिथे त्यांना न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला. अशा परिस्थितीत हे आव्हान पूर्ण करण्यासाठी टीम इंडियाला फायनलमध्ये स्थान मिळवायचे आहे.