टीम इंडिया (Photo Credit: PTI)

World Test Championship Points Table: पाकिस्तान आणि इंग्लंड (ENG vs PAK) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना खूपच मनोरंजक होता. बर्‍याच दिवसांनी कसोटी क्रिकेटमधला थरार पाहायला मिळाला, जो अनेकदा टी-20 आणि वनडेमध्ये पाहायला मिळतो. इंग्लंडने पाकिस्तानचा 74 धावांनी पराभव करून कसोटी मालिकेत आघाडी घेतली. दरम्यान, या सामन्यानंतर अर्थात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत (WTC Point Table) मोठा फेरबदल झाला आहे. सामना गमावल्यानंतर पाकिस्तानला (Pakistan) नुकसान होणार होते आणि तसेच झाले आहे आणि इंग्लंडच्या विजयाचा फायदा टीम इंडियाला (Team India) झाला.

पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर 

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलबद्दल बोलायचे झाले तर, यावेळीही ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. ऑस्ट्रेलियाने नुकताच वेस्ट इंडिजचा पराभव केला होता, आता त्याची फायनलमध्ये जाण्याची शक्यता आणखी वाढली आहे. दुसऱ्या क्रमांकाबद्दल बोलायचे झाले तर दक्षिण आफ्रिकेचा संघ या खुर्चीवर आहे, ज्याची विजयाची टक्केवारी आता 60 आहे, तसेच संघाचे 72 गुण आहेत. श्रीलंकेचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेचे 53.33 विजय असून त्यांचे सध्या 64 गुण आहेत. (हे देखील वाचा: कर्णधारपदानंतर Rahul Dravid प्रशिक्षकामध्ये 'अपयश', Team India ला मिळू शकतो T20 साठी नवा प्रशिक्षक!)

टीम इंडियाला फायदा

याआधीही भारतीय संघाने चौथ्या क्रमांकावर कब्जा केला होता आणि अजूनही कायम आहे. टीम इंडियाची विजयाची टक्केवारी 52.08 असून तिचे 75 गुण आहेत. पाकिस्तानी संघ अजूनही पाचव्या क्रमांकावर आहे, मात्र या सामन्यातील पराभवानंतर पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानी संघाची विजयाची टक्केवारी ५१.८५ होती आणि पाकिस्तानी संघ भारतीय संघाच्या अगदी जवळ होता. पण आता संघाची विजयाची टक्केवारी 46.67 वर गेली आहे. पाकिस्तानी संघाचे आता 56 गुण झाले आहेत.

भारत बांगलादेशसोबत खेळणार दोन कसोटी सामने

दुसरीकडे, भारतीय संघाबद्दल बोलायचे झाले तर, बांगलादेशविरुद्धचे दोन एकदिवसीय सामने पूर्ण झाल्यानंतर, दोन्ही संघांमध्ये आणखी दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. यात भारतीय संघ जिंकला तर त्याचे गुण आणि विजयाची टक्केवारी दोन्ही वाढेल आणि भारतीय संघ आणखी पुढे जाऊ शकेल.