राजकोट: भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिका (IND vs ENG T20I Series 2025) सुरू आहे. पहिले दोन सामने जिंकल्यानंतर टीम इंडियाचा (Team India) आत्मविश्वास शिगेला पोहोचला आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाविरुद्ध इंग्लंडचा संघ काहीसा खराब दिसत होता. कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 7 विकेट्सने पराभव केला, तर चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला पण तिलक वर्माच्या खेळीमुळे भारतीय संघाला 2-1 असा रोमांचक विजय मिळवता आला. आता दोन्ही संघ तिसऱ्या सामन्यात एकमेकांसमोर येतील.
तिसरा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा
आता तिसरा सामना भारत आणि इंग्लंड दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा असेल. टीम इंडिया तिसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल तर इंग्लंडकडे मालिकेत पुनरागमन करण्याची शेवटची संधी असेल. तिसरा टी-20 सामना कधी आणि कुठे खेळला जाईल ते आम्ही तुम्हाल सांगू. (हे देखील वाचा: (हे देखील वाचा: Jos Buttler New Record: जोस बटलरने भारताविरुद्ध मोठी कामगिरी, असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज)
तिसरा टी-20 सामना कधी आणि कुठे खेळला जाईल?
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना मंगळवार, 28 जानेवारी रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल, तर नाणेफेक अर्धा तास आधी संध्याकाळी 6.30 वाजता होईल. हा सामना राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर खेळला जाईल. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये याच मैदानावर दोन्ही संघांमध्ये एक कसोटी सामना खेळवण्यात आला होता.
कुठे पाहणार सामना?
भारतीय चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर टी-20 मालिकेतील तिसरा सामना पाहू शकतील तर डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर ऑनलाइन स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. चाहते हॉटस्टार अॅपमध्ये लॉग इन करून त्यांच्या स्मार्ट टीव्हीवर तिसऱ्या टी-20 सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग देखील पाहू शकतात.
दोन्ही संघांचे संघ पुढीलप्रमाणे आहेत:-
भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक)
इंग्लंड संघ: जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल साल्ट, मार्क वूड.