चेन्नई: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना (IND vs ENG 2nd T20I 2025) आज चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium, Chennai) खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने इंग्लडंचा दोन विकेट राखुन पराभव केला आहे. यासह भारताने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. यादम्यान, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि त्याची बॅट भरपूर धावा काढत आहे. त्याने भारताविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात अर्धशतक आणि 68 धावा केल्या आणि दुसऱ्या टी-20 सामन्यातही जोरदार फलंदाजी केली. पण दुसऱ्या सामन्यात तो फक्त पाच धावांनी त्याचे अर्धशतक हुकले. त्याने 30 चेंडूत 45 धावा केल्या, ज्यात 2 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. यासह, तो भारताविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला.
असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
जोस बटलरने आतापर्यंत भारताविरुद्ध 24 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण 604 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 5 अर्धशतके त्याच्या बॅटमधून आली आहेत. भारताविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 धावांचा टप्पा गाठणारा तो एकमेव फलंदाज आहे. बटलरपूर्वी भारताविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम निकोलस पूरनच्या नावावर होता. भारताविरुद्ध पूरनने 592 टी-20 धावा केल्या होत्या. आता बटलरने पूरनला मागे टाकले आहे.
भारताविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज:
जोस बटलर – 604 धावा
निकोलस पूरन - 592 धावा
ग्लेन मॅक्सवेल – 574 धावा
डेव्हिड मिलर – 524 धावा
आरोन फिंच – 500 धावा
हे देखील वाचा: IND Beat ENG 2nd T20I 2025 Match Scorecard: रोमहर्षक सामन्यात भारताचा इंग्लंडवर 2 विकेट राखुन विजय, तिलक वर्माने एकहाती लढवली खिंड
टी-20 क्रिकेटमध्ये 150 षटकार पूर्ण
भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात जोस बटलरने 3 षटकार मारले. यासह त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 षटकार पूर्ण केले आहेत. तो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 षटकार मारणारा इंग्लंडचा पहिला फलंदाज ठरला. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याने 200 षटकार मारले आहेत.
भारताविरुद्ध केले पदार्पण
जोस बटलरने 2011 मध्ये भारताविरुद्ध इंग्लंडकडून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत इंग्लंडसाठी 1301 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3502 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने एक शतक आणि 26 अर्धशतके झळकावली आहेत.