Tilak Verma (Photo Credit - X)

चेन्नई: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना (IND vs ENG 2nd T20I 2025) आज चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium, Chennai) खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने इंग्लडंचा दोन विकेट राखुन पराभव केला आहे. यासह भारताने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. (हे देखील वाचा: IND vs ENG 2nd T20I 2025 Live Score Update: वरुणने पुन्हा हॅरी ब्रुकचा उडवला त्रिफळा; पाहा व्हिडिओ)

इंग्लंडची वाईट सुरुवात

नाणेफेक गमावल्यानंतर इंग्लंड प्रथम फलंदाजी करण्यासाठी आला आणि त्यांची सुरुवात निराशाजनक झाली कारण दोन्ही सलामीवीर केवळ 8 धावांवर बाद झाले. संपूर्ण इंग्लंड संघ निर्धारित 20 षटकांत 165 धावांवर ऑलआउट झाला. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरने 45 धावांची शानदार खेळी केली. या खेळीदरम्यान, जोस बटलरने 30 चेंडूत दोन चौकार आणि तीन षटकार मारले. जोस बटलर व्यतिरिक्त ब्रायडन कार्सेने 31 धावा केल्या.

वरुण चक्रवर्तीने आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 2-2 विकेट्स

दुसरीकडे, अर्शदीप सिंगने टीम इंडियाला पहिले मोठे यश मिळवून दिले. टीम इंडियाकडून युवा स्टार गोलंदाज वरुण चक्रवर्तीने आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या, सुंदर आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला 20 षटकांत 166 धावा करायच्या होत्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवातही निराशाजनक झाली आणि दोन्ही फलंदाज केवळ 19 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. टीम इंडियाने 19.2 षटकांत आठ विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. टीम इंडियासाठी, युवा स्फोटक फलंदाज तिलक वर्माने सर्वाधिक 72 धावांची नाबाद खेळी केली. या वादळी खेळीदरम्यान, तिलक वर्माने 55 चेंडूत चार चौकार आणि पाच षटकार मारले. तिलक वर्मा व्यतिरिक्त वॉशिंग्टन सुंदरने 26 धावा केल्या.

त्याच वेळी, मार्क वूडने इंग्लंड संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. इंग्लंडकडून ब्रायडन कार्सने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. ब्रायडन कार्से व्यतिरिक्त, जोफ्रा आर्चर, मार्क वूड, आदिल रशीद, जेमी ओव्हरटन आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील तिसरा सामना मंगळवार, 28 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर खेळला जाईल.