
Chennai Super Kings vs Royal Challengers Bengaluru: आयपीएल 2025 (IPL 2025) आठवा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बगंळुरू (Chennai Super Kings vs Royal Challengers Bengaluru) यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई (MA Chidambaram Stadium, Chennai) येथे होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बगंळुरूने आपला पहिला विजय निश्चित केला आहे, तर चेन्नई सुपर किंग्जने ही आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली आहे. अशा परिस्थितीत, दोन्ही संघ आपल्या दुसऱ्या विजयासाठी उत्सुक असेल. म्हणूनच आजचा सामना मनोरंजक असेल. आरसीबीचे कर्णधारपद रजत पाटीदारकडे आहे. त्याच वेळी, सीएसकेची कमान ऋतुराज गायकवाडकडे आहे. सामन्यापूर्वी, दोन्ही संघांमधील हेड टू हेड रेकॉर्ड काय आहे ते जाणून घेऊया.
हेड टू हेड रेकाॅर्ड (CSK vs RCB Head to Head)
आयपीएलमध्ये आतापर्यंत आरसीबी आणि सीएसके यांच्यात एकूण 33 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी चेन्नई सुपर किंग्जने 21 सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, आरसीबी संघ 11 मध्ये विजय नोंदवण्यात यशस्वी झाला आहे. तर एका सामन्याचा निकाल लागलेला नाही. चेन्नई संघाने आरसीबीविरुद्ध जास्त सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत, आकडेवारीनुसार, चेन्नईचा वरचष्मा आहे. (हे देखील वाचा: CSK vs RCB IPL 2025 8th Match Live Streaming: आजच्या सामन्यात 'थाला' आणि 'किंग' येणार आमनेसामने, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहूण घेणार लाईव्ह मॅचचा आनंद)
एमए चिदंबरम स्टेडियमवर सीएसके आणि आरसीबीची अशी आहे कामगिरी
एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात एकूण आठ सामने खेळले गेले आहेत. या काळात चेन्नई सुपर किंग्जने सात सामने जिंकले आहेत. तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने फक्त एकच सामना जिंकला आहे. चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत या मैदानावर एकूण 72 सामने खेळले आहेत. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जने 51 सामने जिंकले आहेत. तर, चेन्नई सुपर किंग्जला 20 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आतापर्यंत या मैदानावर एकूण 13 सामने खेळले आहेत. या काळात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पाच सामने जिंकले आहेत आणि आठ सामने गमावले आहेत.