सचिन तेंडुलकर, विराट कोहली की रोहित शर्मा... कोण आहे मर्यादित षटकांमधील सर्वोत्तम फलंदाज, अवघड प्रश्नाचे 'रणजी किंग' वसीम जाफरने दिले उत्तर
सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा (Photo Credit: Getty)

मुंबईकर वसिम जाफर (Wasim Jaffer) हा भारच्या रणजी क्रिकेटमधील रनमशीन म्हणून ओळखला जातो. 42 वर्षीय जाफरने भारतीय क्रिकेट (Indian Cricket) अगदी जवळून पहिले आहे. किमान प्रयत्न आणि जास्तीत जास्त निकालावर विश्वास ठेवणाऱ्या जाफरला सचिन तेंडुलकर Sachin Tendulkar), विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यातील भारतासाठी आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट व्हाईट बॉल क्रिकेटर निवडण्याचे कठीण काम देण्यात आले. पण, जाफरने जास्त विचार न करता थेट उत्तर दिले. भारतासाठी सर्वोत्कृष्ट व्हाईट बॉल क्रिकेटरसाठी जाफरची निवड म्हणजे सध्याचा कर्णधार विराट कोहली. CricTracker च्या एका मुलाखतीत सचिन, कोहली आणि शर्मापैकी सर्वोत्तम क्रिकेटपटू कोण विचारले असता त्याने कोहलीची निवड केली. आधुनिक काळातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखल्या जाणार्‍या तेंडुलकरच्या नावावर दोन्ही प्रकारच्या फलंदाजीच्या सर्वाधिक रेकॉर्डची नोंद आहे. (सौरव गांगुलीच्या XI ने टेस्ट क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या XI चा पराभव करू शकते, आकाश चोपडाचे मत; जाणून घ्या दोन्ही संघांच्या खेळाडूंची नावे)

कोहलीचे नाव घेत जाफरने वनडे आणि टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम भारतीय खेळाडू असल्याचे सांगितले. सचिनने 463 वनडे सामन्यात 18,426 धावा आहेत. त्याने 44.83 च्या सरासरीने खेळताना 49 शतके ठोकली होती. त्याच्या तुलनेत विराटची आकडेवारी पाहता त्याने 248 वनडे सामन्यात 43 शतकांसह 11,867 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, रोहितने 29 शतकं आणि 3 द्विषटकांसह वनडे क्रिकेटमध्ये 9,115 धावा केल्या आहेत.

दुसरीकडे, जाफरने त्याच्या आवडत्या जोडीदाराचे नावही सांगितले. जाफर म्हणाला, "वीरेंद्र सेहवाग असला पाहिजे कारण तो मनोरंजक होता." जाफरची नुकतीच उत्तराखंड संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल, या दोन भारतीय क्रिकेटपटूंमधील निवड करताना जफर म्हणाला, “दोघेही खूप हुशार आहेत. जर शॉ योग्य ठिकाणी आपले डोके ठेवत असेल तर, त्याला खूप दूर जाण्याची संधी आहे. ज्या प्रकारचा खेळ त्याच्याजवळ आहे तो एक खास कौशल्य आहे. पण त्याला तोल सांभाळण्याची गरज आहे. गिलनेदेखील दोन्ही हातांनी संधी आणि गुणवत्ता मिळविली आहे.”