सौरव गांगुलीच्या XI ने टेस्ट क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या XI चा पराभव करू शकते, आकाश चोपडाचे मत; जाणून घ्या दोन्ही संघांच्या खेळाडूंची नावे
विराट कोहली, सौरव गांगुली (Photo Credit: Getty)

सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) नेतृत्वात टीम इंडियाने (Indian Team) कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या (Virat Kohli) संघाचा सहज पराभव केला असता, असे माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोपडा (Aakash Chopra) यांचे मत आहे. चोपडाने दोन्ही संघांमधील काल्पनिक तुलना केली ज्यात गांगुलीची बाजू अधिक मजबूत झाली. प्रख्यात भाष्यकार आकाश यांनी दोन्ही खेळाडूंच्या कर्णधारपदाच्या शैलीबद्दल बोलले आणि म्हणाला की कोहलीची टीम 2018-19 ची ऑस्ट्रेलिया मालिका जिंकण्याशिवाय परदेशातही ठसा उमटवू शकली नाही. कर्णधार म्हणून विराटच्या नेतृत्वात टीम;या दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले. तर सौरवच्या टीमने इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये विजयाची चव चाखली. गांगुलीबाबत चोपडा म्हणाले की, माजी भारतीय कर्णधार परदेशी भूमीवर कसे विजय मिळवायचा हे संघाला शिकवत असे. (स्थानिक क्रिकेटमध्ये काही प्रमाणात नेपोटिजम असल्याचं आकाश चोपडा यांनी केले मान्य; रोहन गावस्कर, अर्जुन तेंडुलकरचे उदाहरण देत पाहा काय म्हणाले)

“आम्ही ऑस्ट्रेलियाला गेलो आणि तिथे मालिका अनिर्णित केली. आम्ही पाकिस्तानात जाऊन त्यांचा पराभव केला.भारतात आम्ही एक मालिका जिंकली आणि ऑस्ट्रेलियाकडून एक मालिका गमावली. आणि सौरव गांगुलीच्या टीमने इंग्लंडमध्येही मालिका अनिर्णित केली. ही बरीच चांगली टीम होती, परदेशात कसे जिंकता येईल हे शिकवणारी एक टीम होती,” आकाश यांनी आपल्या यूट्यूब व्हिडिओमध्ये म्हटले. “विराट कोहलीच्या संघाने घरच्या परिस्थितीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. भारतीय क्रिकेट इतिहासात अशी एकमेव टीम आहे. परंतु दक्षिण आफ्रिकेत त्यांचा पराभव झाला आणि इंग्लंडमध्ये तो फारच खराब झाला. दक्षिण आफ्रिकेत तेविजयाच्या जवळ आले पण मालिका 2-1 ने गमावली.”

परंतु आकडे दादाच्या तुलनेत ते कोहलीसाठी चांगले आहेत. कोहली भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. त्याने 33 सामने जिंकले आहेत आणि 12 गमावले, तर गांगुलीने आपल्या कारकीर्दीत 21 कसोटी सामने जिंकले आणि 13 गमावले. या दोन कर्णधारांचे विश्लेषण करण्यासाठी करण्यासाठी आकाश यांनी ही प्लेयिंग इलेव्हन निवडली:

सौरव गांगुलीचा इलेव्हनः वीरेंद्र सेहवाग, आकाश चोपडा, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, सौरव गांगुली, पार्थिव पटेल, हरभजन सिंह, अनिल कुंबळे, झहीर खान आणि अजित आगरकर.

विराट कोहलीचा इलेव्हन: रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी/जसप्रीत बुमराह.