आकाश चोपडा (Photo Credit: Instagram)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या निधनानंतर पुन्हा नेपोटिजम (Nepotism) बाबत सतत चर्चा होत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत नेहमीच नेपोटिजमचा विषय असतोच पण सुशांतच्या अकाली निधनाने या विषयावर सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. भारताचा माजी फलंदाज आकाश चोपडानेही (Aakash Chopra) या विषयावर व नेपोटिजममुळे क्रिकेटवर (Nepotism in Cricket) काय परिणाम झाला यावर चर्चा केली. चोपडा यांनी स्पष्ट केले की क्रिकेटमध्ये अन्य उद्योगांप्रमाणे नेपोटिजमचा प्रभाव कमी आहे. ते म्हणाले की एखाद्या खेळाडूला उच्च पातळीवर खेळायचे असेल तर कठोर मेहनत आवश्यक आहे कारण एखाद्या ताटात काहीही सजवून दिले जाणार नाही. नेपोटिजमबाबत समजावताना रोहन गावस्कर (Rohan Gavaskar) आणि अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) यांची उदाहरणे उद्धृत करताना चोपडा म्हणाले की प्रत्येकाला घरगुती सर्किटमध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळते. पण स्थानिक पातळीवर काही प्रमाणात नेपोटिजम होत असल्याचं त्यांनी मान्य केलं. (आकाश चोपडा याने निवडली बेस्ट वनडे XI; परदेशी कर्णधारासह 4 भारतीय क्रिकेटपटूंचा केला समावेश)

रोहन गावस्करचा उल्लेख करत आकाश म्हणाला,"सुनील गावस्करचा मुलगा म्हणून त्याने हसत वनडे आणि टेस्ट सामने खेळायला हवं होतं, पण तसे झाले नाही. स्थानिक स्पर्धांमध्ये बंगालकडून सातत्यपूर्ण कामगिरी केल्यावर त्याला भारतीय संघात स्थान मिळाले. गावस्कर आडनाव असूनही त्याला मुंबईच्या रणजी टीममध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही, सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनबद्दलही असेच म्हणता येईल, त्याने एका ताटात त्याला काहीही वाडून मिळाले नाही. इतर स्तराच्या तुलनेत उच्च पातळीवर कोणतीही तडजोड केली जात नाही, मला असे वाटत नाही की नेपोटिजम क्रिकेटमध्ये तितकेसे संबंधित आहे.”

अर्जुन तेंडुलकर अद्याप भारताकडून सर्वोच्च स्तरावर खेळलेला नाही, तर रोहन गावस्करने केवळ 11 वनडे सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहेत. बॉलिवूड अभिनेता सुशांतच्या निधनानंतर पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत नेपोटिजमच्या चर्चेला सुरुवात झाली. या चर्चेची दखल घेत एका चाहत्याने चोपडा यांना क्रिकेटमध्ये नेपोटिजम आहे की नाही असे विचारले.