आकाश चोपडा याने निवडली बेस्ट वनडे XI; परदेशी कर्णधारासह 4 भारतीय क्रिकेटपटूंचा केला समावेश
भारतीय क्रिकेट टीम (Photo Credit: Getty)

भारताचा माजी सलामीवीर आणि सध्या स्टार हिंदी भाष्यकार आकाश चोपडा (Aakash Chopra) यांनी सध्याचा सर्वोत्तम वनडे संघ निवडला आहे. चोपडा यांनी या संघात 4 भारतीय (Indian) खेळाडू, इंग्लंड आणि न्यूझीलंडचे दोन, एक बांग्लादेशी, एक ऑस्ट्रेलियन आणि वेस्ट इंडिजच्या एका खेळाडूचा प्लेइंग इलेव्हनयामध्ये समावेश केला आहे, तर पाकिस्तानच्या एका खेळाडूची 12 वा खेळाडू म्हणून निवड केली. दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि अफगाणिस्तानमधील कोणतेही खेळाडू संघात नाहीत. चोपडा यांनी डावाची सुरुवात करण्यासाठी भारताचा रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि वेस्ट इंडिजचा शाई होपला निवडले. होपचीही संघात यष्टीरक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू आकाशने यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार आरोन फिंचला दुसरा सलामी फलंदाज म्हणून निवडले होते, पण त्याला यष्टीरक्षकही हवा असल्याने त्याने शाई होपची निवड केली आहे, ज्याची अलीकडील वनडे क्रिकेमधील कामगिरीही अप्रतिम आहे. (विराट कोहली, सचिन तेंडुलकरसह दिग्गजांचा लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडच्या Non-Honours बोर्ड XI मध्ये समावेश, पाहा लिस्ट)

नंबर 3 आकाशने भारतीय कर्णधार विराट कोहलीची निवड केली आहे, परंतु विराटची या संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली नाही. चौथ्या क्रमांकावर त्याने किवी दिग्गज रॉस टेलर, तर 5 व्या क्रमांकावर इंग्लंडचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार इयन मॉर्गनला निवडले. आकाशने मॉर्गनकडे कर्णधारपदाची जबाबदारीही दिली आहे. शकीब अल हसन आणि बेन स्टोक्स हे अष्टपैलू 6 व 7 व्या क्रमांकावर आहेत.

गोलंदाजी विभागात आकाश चोप्राने जसप्रीत बुमराहपेक्षा मोहम्मद शमीला पसंती दिली. त्याशिवाय त्याने ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क आणि न्यूझीलंडचा लॉकी फर्ग्युसन यांची देखील संघात निवड केली आहे. आठव्या क्रमांकावर स्टार्क, नवव्या क्रमांकावर कुलदीप यादव, दहाव्या क्रमांकावर मोहम्मद शमी आणि 11 व्या क्रमांकावर फर्ग्युसन आहे. आकाशने 12वा खेळाडू म्हणून पाकिस्तानच्या बाबर आझमला शामिल केले.

पाहा आकाश चोपडाचा सर्वोत्तम वनडे इलेव्हन: रोहित शर्मा, शाई होप, विराट कोहली, रॉस टेलर, इयन मॉर्गन (कॅप्टन), शाकिब-अल-हसन, बेन स्टोक्स, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन आणि बाबर आजम (12वा खेळाडू)