लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर शतक ठोकणे किंवा पाच गडी बाद करणे प्रत्येक क्रिकेटपटूसाठी एक स्वप्नवत क्षण आहे. यापैकी कोणतेही रेकॉर्ड नोंदवल्याने एखाद्या खेळाडूला प्रतिष्ठित लॉर्ड्स ऑनर्स बोर्डामध्ये (Lords Honous Board) प्रवेश करण्याचा मान मिळतो, पण हे करणे इतके सोप्पे नसते. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) , ब्रायन लारा, जॅक कॅलिस यासारख्या खेळाडूंनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक विक्रम नोंदवले पण कोणत्याही दिग्गजांला ऑनर्स बोर्डमध्ये स्थान मिळवता आले नाही. विराट कोहली (Virat Kohli) याचीही तीच अवस्था आहे. तो तीनदा इंग्लंडला गेला होता पण अद्याप क्रिकेटची पांढरी म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्स स्टेडियममध्ये त्याला एकदाही शतक करता आले नाही. यामुळे त्याचे नाव लॉर्ड्सच्या ऑनर्स बोर्डावर अद्याप झळकले नाही. अलीकडेच लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडने ज्या खेळाडूंचे नाव ऑनर्स बोर्डावर दिसत नाही अशा प्लेइंग इलेव्हन जाहीर केले. यामध्ये विराटसह अनेक महान क्रिकेटपटूंचा समावेश आहे. (लॉकडाउन संपल्यावर सचिन तेंडुलकर याच्या 'या' विक्रमांवर विराट कोहलीचा डोळा, यंदा करू शकतो मास्टर-ब्लास्टरच्या वनडेमधील मोठ्या रेकॉर्डची बरोबरी)
या यादीची सुरुवात इंग्लंडचे माजी फलंदाज डब्ल्यूजी ग्रेसपासून होते, ज्यांनी 22 कसोटी सामन्यात 1098 धावा केल्या आहेत. कारकीर्दीत त्यांनी दोन शतकं आणि पाच अर्धशतकं झळकावली. त्यांच्यानंतर यादीत भारताचा वीरेंद्र सहवाग आहे, ज्याने 23 कसोटी शतके ठोकली. या यादीमध्ये तेंडुलकर आणि लाराची पुढील दोन नावं आहेत. लॉर्ड्सवर सचिनने पाच कसोटी सामने खेळले पण त्यापैकी कोणत्याही कसोटीत त्याला अर्धशतकाचा टप्पाही गाठता आला नाही. लॉर्ड्सवर त्याची सर्वोच्च धावसंख्या 37 आहे. दुसरीकडे लाराने लॉर्ड्स येथे तीन कसोटी सामने खेळले आणि 1995 मध्ये सर्वाधिक 54 धावा केल्या. या यादीत टीम इंडियाचा कर्णधार कोहलीचा पुढील नंबर लागतो. त्याने चार डावात 65 धावा केल्या आहेत.
Some of cricket's greatest ever players do not appear on the famous Lord's Honours Boards.
How do you think this Non-Honours Board XI would go? 🤔 #LoveLords pic.twitter.com/uWey8QNE9c
— Lord's Cricket Ground (@HomeOfCricket) May 26, 2020
या यादीत कोहलीनंतर जॅक कॅलिस आहे, जो सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. ना तो शतक ठोकू शकला किंवा लॉर्ड्स येथे तो पाच-फलंदाजांना बाद करू शकला. ऑस्ट्रेलियाचा अॅडम गिलक्रिस्ट सातव्या क्रमांकावर आहे. त्याच्यापाठोपाठ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसर्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट घेणारा शेन वॉर्न आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 414 गाडी बाद करणारा वसीम अक्रमही लॉर्ड्समध्ये पाच विकेट घेऊ शकला नाही. ऑस्ट्रेलियाचा महान डेनिस लिली आणि कर्टली एम्ब्रोस पुढे आहेत.