ICC Worldcup 2019  मध्ये पाकविरुद्ध खेळण्याबाबत BCCI जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य - Virat Kohli ची प्रतिक्रिया (Watch Video)
Virat Kohli (Photo Credits: Twitter)

Virat Kohli on India Vs Pakistan in World Cup 2019: पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर (Pulwama Terror Attack)  सामान्य नागरिकांपासून राजकारणी, कलाकार, खेळाडू साऱ्यांनीच या हल्ल्याचा निषेध केला. मात्र त्याचं प्रत्युत्तर कसं द्यायचं याबद्दल मात्र सगळ्याच स्तरांवर मतमतांतरं आहेत. क्रीडाक्षेत्रात आणि प्रामुख्याने क्रिकेट विश्वामध्ये आगामी वर्ल्डकपच्या  (ICC World Cup 2019) पार्श्वभूमीवर पाकिस्तानसोबत खेळावं की नाही? याबद्दल चर्चा सुरु आहेत. हरभजन सिंग (Harbhajan Singh)  आणि सौरव गांगुली (Saurav Ganguli)  यांनी पाकिस्तानवर बहिष्कार टाकण्याचा सल्ला दिला आहे. तर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar)आणि सचिन तेंडुलकर  (Sachin Tendulkar) यांसारख्या दिग्गज खेळाडूंनी पाकिस्तानला क्रिकेटच्या मैदानात नमवून त्याचा बदला घ्यावा असं मत व्यक्त केलं आहे. मात्र आज भारत - ऑस्ट्रेलिया T20I आणि एकदिवसीय सामन्याच्या पार्श्वभूमीवर विराट कोहली (Virat Kohli)  बोलताना त्याने आपलं मत व्यक्त केलं आहे.Pulwama Terror Attack: पुलवामा येथील भ्याड हल्ल्याप्रकरणी रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह अनेक खेळाडूंनी ट्विट करत व्यक्त केल्या भावना

विराट कोहलीने पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. भ्याड हल्ला दुर्दैवी होता. येत्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळताना आम्ही जी देशभावना असेल त्याचा आदर राखू असं म्हटलं आहे. भारत सरकार जे सांगेल आणि बीसीसीआय जो निर्णय घेईल तो आम्हांला मान्य असेल असं विराट कोहली म्हणाला. Indian Cricket Team 2019 Schedule: नव्या वर्षात कसं असेल भारतीय क्रिकेट संघाचं वेळापत्रक?

24 फेब्रुवारी पासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 2 T20I सामने आणि 5 वनडे सामने रंगणार आहेत. इंग्लंड आणि वेल्स येथे 30 मे पासून वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे, सध्याच्या वेळापत्रकानुसार 16 जूनला भारत-पाकिस्तान सामना होणार आहे.