ट्विटर वर 30 मिलियन्स फॉलोअर्स झाल्यानंतर विराट कोहली याने दिली अशी रिअॅक्शन (Watch Video)
Virat Kohli (Photo Credits: Twitter)

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (VIrat Kohli) याचे देशातच नाही तर जगभरात लाखो-करोडो चाहते आहे. विराटच्या दमदार खेळासोबतच त्याचा स्टायलिस्ट अंदाज अनेकांना भावतो. आपल्या आवडत्या सेलिब्रेटीचे सततचे अपडेट्स घेण्यासाठी त्यांना सोशल मीडियावर फॉलो करणे हा एक सोपा पर्याय सध्या तरुणाईकडे उपलब्ध आहे. त्यामुळे तरुणींसोबतच अनेक तरुणही विराटला सोशल मीडियावर फॉलो करत असतात. विराटची ख्याती पटवणारी अजून एक गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे विराटने नुकतेच ट्विटरवर 30 मिलियन्स फॉलोअर्स पूर्ण केले आहेत. (लाखो-करोडो फॉलोअर्स असलेला विराट कोहली ट्विटरवर या '5' परदेशी क्रिकेटर्संना करतो फॉलो!)

चाहत्यांनी दिलेल्या या प्रेमाचे खुद्द विराटने ट्विट करत आभार मानले आहेत. एक खास व्हिडिओ शेअर करत विराटने चाहत्यांनी दिलेल्या प्रेम आणि आदराबद्दल प्रत्येकाला धन्यवाद दिले आहेत. (फेसबुकवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले हे आहेत '3' भारतीय क्रिकेटर्स!)

विराट कोहली ट्विट:

सध्या विराटसेना इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या आईसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये व्यस्त असून वर्ल्डकपमधील आतापर्यंत झालेले तिन्ही सामने टीम इंडियाने जिंकले आहेत.