Virat Kohli and Anushka Sharma (Photo Credit: Instagram)

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या पत्नी अनुष्का शर्मासोबत (Anushka Sharma) सुट्ट्या एन्जॉय करत आहे. न्युझीलंडमधील एका जंगलात फिरत असतानाचा खास फोटो विराटने सोशल मीडियावर शेअर केला आहे. BCCI ने विराटला न्युझीलंड एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यात आणि 6 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या T20I सिरीजमध्ये विश्रांती दिली आहे. त्यामुळे असलेला वेळ विराट आपल्या पत्नीसोबत घालवत आहे.

न्युझीलंडमध्ये फिरताना विराटने खास फोटो शेअर करत फक्त 'माईन' असे लिहून अनुष्काला टॅग केले आहे.

अनुष्कासोबत सुट्ट्यांचा आनंद घेताना विराट कोहली...

 

View this post on Instagram

 

mine @anushkasharma

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

विराट-अनुष्का आपल्या व्यग्र जीवनशैलीतून वेळ काढून एकमेकांसोबतच्या खास क्षणांचा आनंद घेत आहेत. विरुष्का या जोडीचा प्रचंड चाहता वर्ग आहे. हे दोघेही अनेकदा काही खास क्षणांची झलक सोशल मीडियात शेअर करत असतात. सोशल मीडियावरील त्यांच्या फोटोंच्या प्रेमात अनेकजण आहेत.