ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शानदार शतकानंतर अनुष्का शर्माने शेअर केला विराट कोहलीचा Cute Video
Virat Kohli & Anushaka Sharma (Photo Credits: Instagram)

ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दुसऱ्या सामन्यात भारताने 6 गडी राखत विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) शानदार शतक झळकवले. 104 धावांची खेळी करत विराटने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावली. त्याच्या या दमदार खेळीमुळे तो 'मॅन ऑफ द मॅच' (Man Of The Match) ठरला. सामन्यानंतर मात्र विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma) विराटचा एक क्युट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

यात अनुष्काने पप्पी फिल्टरचा वापर करत विराटाचा व्हिडिओ बनवला आहे आणि 'क्युटी' असे लिहून तो शेअर केला आहे.

तुम्हीही पाहा हा व्हिडिओ....

सध्या अनुष्का ऑस्ट्रेलियात विराटसोबत वेळ घालवत असून अलिकडेच तिने विराटसोबतचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले होते.