Virushka Wedding Anniversary: विराट कोहली, अनुष्का शर्माने शेअर केला खास व्हिडिओ (Video)
Virushka wedding anniversary (Photo Credit: Instagram)

virushka Wedding Anniversary:  मागील वर्षी इटलीमध्ये विराट कोहली (Virat Kohali)  आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) ही जोडी गुपचूप लग्नबंधनात अडकली. मीडियापासून, चाहत्यांपासून विरूष्काने आपल्या लग्नाची बातमी लपवून ठेवली होती. 11 डिसेंबर 2017 ला विवाहबंधनात अडकलेल्या या जोडीची आज पहिली अ‍ॅनिव्हर्सरी (Virushka Wedding Anniversary) आहे. विराट आणि अनुष्काने त्यांच्या लग्नाच्या समारंभातील काही खास फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

अनुष्कासाठी खास विराटचा मेसेज .. 

 

लग्न होईपर्यंतच्या सकाळी एक मुलगाच होतो.पण माझ्या बायकोमुळे आता मी एक Mature माणूस झालो आहे. लग्नानंतर आयुष्य बदल्याच्या भावना काही दिवसांपूर्वी सोबत बोलतानादेखील विराटने व्यक्त केल्या आहेत.

सध्या विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर आहे. भारतीय संघाने काल कसोटी सामन्यांच्या सीरिजची विजयी सलामी दिली आहे. त्यामुळे विराट साठी सध्या डबल सेलिब्रेशन आहे. आज विराट कोहलीने सोधल मीडियामध्ये लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. तर अनुष्का शर्माने आज लग्नाच्या विधींमधला खास व्हिडिओ शेअर केला आहे. मात्र या व्हिडिओमध्ये विराटच्या मनातील भावना रेकॉर्ड करण्यात आल्या आहेत.