टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी Virat Kohli याची रवी शास्त्री यांना पसंती; हर्षा भोगले आणि आकाश चोप्रा यांनी दिल्या हटके प्रतिक्रिया
रवी शास्त्री आणि विराट कोहली (Photo Credit/PTI)

भारतीय क्रिकेट बोर्ड, बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक आणि स्टाफ यांच्या बदल्या करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri), बॉलिंग कोच आर श्रीधर (R Sridhar)आणि बॅटिंग कोच संजय बांगर (Sanjay Bangar) यांना लवकरच हातात नारळ मिळणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. दरम्यान, कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला कोचसाठी त्याची पसंती विचारण्यात आली असता तो म्हणाला की, "मला बीसीसीआयने नेमलेल्या विशेष समितीने संपर्क केलेला नाही. माझे मत जर ग्राह्य धरले जाणार असेल तर, मी त्यांच्याशी जाऊन याबाबत चर्चा करेन. शास्त्रींसोबत माझे संबंध चांगलेच आहे. ते मुख्य प्रशिक्षक म्हणून राहिले तर मला आनंदच आहे. पण मला अजूनही याबाबत संपर्क करण्यात आलेला नाही." (IND vs WI: विराट कोहली याने शेअर केला टीम इंडियासोबतचा Photo, रोहित शर्मा कुठंय विचारत Netizens ने घेतली फिरकी)

दरम्यान, विराटचा रवी शास्त्री यांनी पाठिंबा दर्शवणे हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांना पसंत पडले नाही. भोगले यांना वाटते की कोहलीची शास्त्रीसाठी पसंती दर्शविण्याची वेळ चुकीची आहे कारण मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणारे लोक आहेत आणि प्रक्रिया चालू असताना आपला कल दाखवणे हे अन्यायकारक आहे. आकाश चोप्रा (Aakash Chopra) यांच्या प्रश्नावर भाष्य करताना भोगलेने आपला मुद्दा स्पष्ट केला. चोप्रा ने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, "कॅप्टनने त्यांची पसंती दर्शवली आहे. सीएसी सदस्यांपैकी एकाने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी असेच केले आहे. त्यामुळे ज्यांनी आधीच अर्ज केले आहेत किंवा अर्ज करायचे आहेत त्यांना शुभेच्छा." यावर भोगले म्हणाले, "मी विशेषतः विराटबद्दल बोलत नव्हतो. मी समजू शकतो की जेव्हा आपल्याला एखादा प्रश्न विचारला जातो तेव्हा आपल्याला त्याचे उत्तर द्यायचे असते. पण ज्या क्षणी हा प्रश्न विचारला गेला होता, त्यावेळी कोणीतरी असे म्हणायला हवे होते की निवड प्रक्रिया चालू आहे आणि म्हणूनच, त्याचे उत्तर देणे त्याला योग्य ठरणार नाही."

दुसरीकडे, आयएएनएसने (IANS) दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांनी शास्त्री यांचे पद कायम ठेवण्यात येणार आहे असे म्हटले आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी, "सध्या काही बदल होतील असे वाटत नाही. शास्त्री आणि कोहली दोघंही एकमेकांना पुरक आहेत", असे सांगितले. तसेच, नवीन प्रशिक्षक आल्यास खेळाडूंना नव्यानं सगळ्याची सुरुवात करावी लागले. टी-20 वर्ल्ड कपसाठी केवळ वर्षाचा कालावधी उरला आहे. त्यामुळं नवीन कोच संघाचे समीकरण बदलू शकतात. त्यामुळे शास्त्रींना प्रशिक्षक पदी कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.