भारतीय संघ सोमवारी रात्री वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. या दरम्यान, भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) संघात 3 टी-20, 3 वनडे आणि 2 टेस्ट सामन्यांची मालिका खेळण्यात येईल. या दौऱ्यासाठी भारताचे नेतृत्वाची जबाबदारी विराट कोहली (Virat Kohli) याच्याकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान, कर्णधार कोहलीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एअरपोर्टवरील एक फोटो शेअर केला. आणि याची सोशल मीडियावर चांगलाचीच चर्चा रंगली आहे. विराटने शेअर केलेल्या फोटोमध्ये कोहलीसह मनीष पांडे (Manisha Pandey), के. एल राहुल (KL Rahul), कृणाल पंड्या (Krunal Pandya), खलील अहमद (Khaleel Ahmed), वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) हे खेळाडू आहेत. पण भारताचा सलामीवीर आणि उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) या फोटोमध्ये नाही आहे. दुसरीकडे, रोहितने देखील मुंबईकर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्या सोबतच फोटो शेअर केला आहे. (IND vs WI: वेस्ट इंडिज दौऱ्यादरम्यान रोहित शर्मा झाला भावुक, शेअर केला खास फोटो; पत्नी रितिका हिने देखील काढली आठवण)
क्रिकेट विश्वचषकनंतर रोहित आणि विराट यांच्यात वाद निर्माण झाल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, विंडीजसाठी रवाना होण्याआधी विराटने यावर आपली प्रतिक्रिया देत सर्वांची बोलती बंद केली. पण विराटने एअरपोर्टवरील शेअर केलेल्या हा फोटो आणि त्यात रोहितची अनुपस्थिती चाहत्यांना खुणावू लागली आहे. विराटच्या या फोटोमध्ये रोहित नसल्याने नेटकऱ्यांनी रोहित कुठे आहे असे प्रश्न उपस्थित केले.
रोहित शर्मा कुठे आहे?
@ImRo45 जी कहाँ है?😛
— Yadav ↗️ (@JaiShreeRam90) July 29, 2019
रोहित शर्मा नाही, मी पाहू शकतो
No Rohit Sharma, I can see.
— EngiNerd. (@mainbhiengineer) July 29, 2019
रोहित तुझ्यापेक्षा चांगला कर्णधार आणि खेळाडू असल्याने तुला त्याचा हेवा वाटतो
Where is Rohit😠😠😠
You're jealous of him as he is a better captain and player than you kolly.
— Hawkeye. (@hawkeye_003) July 29, 2019
कॅप्टन रोहित कुठे आहे?
Where is CAPTAIN ROHIT?
— Mohit (@Luv_u_re) July 29, 2019
विश्वचषकच्या सेमीफायनलमध्ये भारताच्या पराभवानंतर रोहित आणि विराट यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. तसेच रोहितने विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharm) हिला इंन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याच्या चर्चा प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात रंगल्या होत्या. मात्र सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत विराटने हे सर्व आरोप फेटाळून लावले. या सर्व कोहली म्हणाला की,'' मी पण खूप काही ऐकले आहे. पण, संघात तसं काहीच नाही. जर ड्रेसिंग रुमचे वातावरण चांगले नसते तर मागील दोन वर्षांत संघाची कामगिरीचा आलेख चढा राहिला नसता. त्यामुळे संघात वाद नाही. ऑल इज वेल... अशा चर्चा येणं ही लाजीरवाणी गोष्ट आहे. अशा चर्चा होणे दुर्दैवी असल्याचे त्याने स्पष्ट केले.