रोहित शर्मा, रितिका सजदेह आणि लेक समयरा (Photo Credit: Rohit Sharma/Instagram)

आयसीसी (ICC0 क्रिकेट विश्वचषकच्या सेमीफायनलमधील पराभव मागे टाकत भारतीय संघ (Indian Team) वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. भारत (India) आणि वेस्ट इंडिज संघात 3 ऑगस्टपासून 3 टी-20, 3 वनडे अणे 2 टेस्ट सामन्यांची मालिका खेळण्यात येईल. यासाठी भारताचे नेतृत्व विराट कोहली (Virat Kohli) याच्याकडे देण्यात आले आहे. विश्वचषकनंतर भारताचा हा पहिला दौरा आहे. विश्वचषकमधील भारतीय खेळाडूंच्या प्रभावी खेळीनंतर सर्वांचे लक्ष सिनियर खेळाडूंकडे असणार आहे. तसेच युवा खेळाडू देखील या दौऱ्यादरम्यान मुख्य भूमिका बजावतील. दरम्यान, भारतीय संघाने विंडीजला रवाना होण्याआधी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे माहिती दिली. विराट, रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यासारख्या खेळाडूंनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एअरपोर्टवरील फोटोज शेअर केले. (विराट कोहली कर्णधारपदी कायम, सुनील गावस्कर यांच्या मतांबद्दल संजय मांजरेकर यांनी दर्शवली असहमती, वाचा सविस्तर)

टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित यानेदेखील फोटोज शेअर केले. पण यातील एक फोटो असा आहे जो अत्यंत भावनिक आहे. विंडीजसाठी रवाना होण्याआधी रोहितने आपली पत्नी रितिका सजदेह (Ritika Sajdeh) आणि लेक समयार (Samaira) सोबतचा एक खूप गोड फोटो शेअर केला. हे फोटो शेअर करताना रोहितने लिहिले, "माझ्या स्क्वाडची आठवण येईल." यावर त्याची पत्नी रितिकाने देखील इमोशनल रिप्लाय दिला. रितिका म्हणाली, "आम्हाला आतापासूनच तुझी आठवण येतेय, बाय-बायसाठी कठीण दिवस."

 

View this post on Instagram

 

Gonna miss my squad 😞

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45) on

दुसरीकडे, विश्वचषकमधील पराभवानंतर विराट आणि रोहित यांच्यात मतभेत असल्याचे वृत्त समोर आले होते. भारतीय संघात विराट आणि रोहित असे दोन गट झाल्याचे बोलले जात होते. मात्र, विंडीजसाठी निघण्यापूर्वी कर्णधार विराटने यावर आपले मौन सोडले आणि यासर्व गोष्टी अफवा असल्याचे म्हटले. विश्वचषकनंतर रोहित आणि विराट यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. सुत्रांच्या माहितीनुसार क्रिकेट प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांचा कर्णधार विराट कोहलीला पाठींबा आहे. त्यामुळेच दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध टेस्ट मालिकेत पराभव होऊनही विराटवर कारवाई करण्यात आली नव्हती, असा आरोप करण्यात आला होता.