Virat Kohli and Rohit Sharma | (Photo Credits- Twitter @BCCI)

भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्टइंडीजचा ८ विकेट्सने धुव्वा उडवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. वेस्टइंडीज ने पहिले फलंदाजी करत ३२३ धावा केल्या. भारताने ही धावसंख्या कर्णधार विराट कोहलीच्या १४० आणि सलामीवीर रोहित शर्माच्या दीडशतकाच्या जोरावर सहज पार केले. या सामन्यात विराट कोहलीने सचिन तेंडूलकरच्या एका रेकॉर्डला मागे टाकले. विराटने ८८ चेंडूत आपले शतक साजरे केले. त्याच्या कारकिर्दीतले हे ३६ वे शतक होते. त्याने हे शतक २०४ डावांमध्ये साजरे केले. तर सचिन तेंडूलकरने आपले ३६ वे शतक ३११ डावांमध्ये ठोकले होते. म्हणून त्याची ही खेळी खऱ्या अर्थाने महत्वाची ठरली.

विराटचा आणखी एक विक्रम नावावर

आपल्या १४० धावांच्या खेळीत विराटने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. एका कॅलेंडर वर्षात २००० धावा करत विराटने भारतासाठी या कॅलेंडर वर्षात सर्वात जास्त धावा केल्या आहेत. त्याने लागोपाठ ३ वर्ष भारतासाठी एकदिवसीय सामन्यात २००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तर कर्णधार म्हणून दोन वेळा त्याने हा विक्रम केला आहे.

रोहित शर्माचे ही विक्रम

रोहित शर्माने नाबाद दीडशतक ठोकत भारताला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. या कामगिरीत त्याने देखील अनेक विक्रम मोडीत काढले. रोहितचं एकदिवसीय क्रिकेट मधलं हे सहावं दीडशतक ठरलं. त्याने सचिन आणि डेव्हिड वॉर्नरला मागे टाकलं. या सामन्यात रोहितने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात भारतामध्ये सर्वात जलद ४००० धावा केल्या. सुनिल गावसकर यांनी 87 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. रोहितने यासाठी 86 डाव घेतले.

भारत आणि वेस्टइंडीज मध्ये दुसरा एकदिवसीय सामना २४ ऑक्टोबरला विशाखापटनमला खेळवला जाणार आहे. या सामनात सुद्धा भारताकडून अशाच दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.