विराट कोहली, अनुष्का शर्मा च्या घरी चिमुकल्या परीचं आगमन
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली (Photo Credits: Twitter)

क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांच्या घरात मुलीचा (Baby Girl) जन्म झाला आहे. विराट कोहलीने ट्वीट करत ही गूड न्यूज सार्‍यांसोबत शेअर केली आहे. आज दुपारी अनुषकाने मुलीला जन्म दिला असून दोघींचीही प्रकृती उत्तम असल्याची माहिती त्याने खास पोस्ट द्वारा दिली आहे. विरूष्काच्या गूडन्यूजवर कला आणि क्रिकेट क्षेत्रामधून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. Virat-Anushka New Year Celebration: हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन्कोविच यांच्यासोबत विराट कोहली आणि अनुष्काने केले नववर्षाचे स्वागत, पहा Inside Photos

विराट सध्या ऑस्ट्रेलिया दौरा मध्येच सोडून अनुष्काला साथ देण्यासाठी मुंबईमध्ये परतला होता. मागील काही दिवस तो सातत्याने अनुष्कासोबत दिसत होता. क्लिनिकमध्ये, अनुष्काच्या घरी देखील गेला होता. डिसेंबर 2017 मध्ये इटलीत विवाह बद्ध झालेली विरुष्का या जोडीचं हे पहिलंचं अपत्य आहे.  नक्की वाचा: Umesh Yadav याला मिळाली गुड न्यूज, चिमूलकीच्या आगमनाची टीम इंडिया गोलंदाजाने खुशखबर, पहा Post.

 

Virat Kohli Tweet

अनुष्का सध्या मॅटर्निटी लिव्ह वर आहे. मे 2021 पर्यंत अनुष्का पुन्हा कामााला सुरूवात करणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान विरूष्काच्या आयुष्यात 11 तारीख ही खास ठरली आहे. 11 डिसेंबर 2017 ला ते दोघे विवाहबद्ध झाले होते. आणि आता त्यांच्या मुलीचा जन्म 11 जानेवारी 2021 ला झाला आहे. विराट देखील सध्या ब्रेकवर आहे. त्याच्या अनुपस्थितीमध्ये क्रिकेट संघाची धुरा अजिंक्य रहाणे सांभाळत आहे.