Virat-Anushka New Year Celebration: हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन्कोविच यांच्यासोबत विराट कोहली आणि अनुष्काने केले नववर्षाचे स्वागत, पहा Inside Photos
विराट कोहली, हार्दिक पांड्याचा गेट टुगेदर (Photo Credits: Instagram)

Virat-Anushka New Year Celebration: भारतीय क्रिकेट संघाने (Indian Team) 2021 चे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नववर्षाचे स्वागत केले तर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि विराट कोहलीने (Virat Kohli) एकत्र जमून हा उत्साह साजरा केला. इन्स्टाग्रामवर दोन्ही खेळाडूंनी या खास प्रसंगी चाहत्यांसह त्यांच्या भेटीचे फोटो शेअर केले. या दरम्यान, हार्दिक आणि विराटसह नताशा स्टॅन्कोविच आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांनी इतर अनेक मित्रांसह पार्टीत हजेरी लावली. पितृत्व रजेवर असणारा टीम इंडियाच्या नियमित भारतीय कर्णधाराने चाहत्यांना शुभेच्छा देत एक सुंदर कॅप्शनसह पोहोज शेअर केले. “एकत्र नकारात्मकतेची चव चाखणारे मित्र एकत्र सकारात्मक वेळ घालवतात! सुरक्षित वातावरणात मित्रांसह एकत्र येण्यासारखे काहीही नाही. हे वर्ष भरपूर आशा, आनंद आणि चांगले आरोग्य आणो. सुरक्षित राहा! नववर्ष 2021च्या शुभेच्छा,” 32-वर्षीय कोहलीने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले. (Happy New Year 2021: भारतीय क्रिकेटपटूंनी चाहत्यांना नववर्षाच्या दिल्या शुभेच्छा; केएल राहुलने ऑस्ट्रेलियामधून शेअर केला खास फोटो, पहा Tweets)

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या आगामी मालिकेच्या टीम इंडिया संघात हार्दिकला संधी मिळाली नाही तर विराट अ‍ॅडिलेड ओव्हल येथील पहिला कसोटी सामन्यानंतर अनुष्काच्या बाळंतपणासाठी मायदेशी परतला आहे. न्यू ईयर पार्टीमध्ये विराट आपली अभिनेत्री पत्नीसह पूर्ण आनंद घेतला असल्याचे दिसत आहे. अनुष्काने प्रिंटेट ब्लॅक ड्रेस परिधान केला होता आणि विराटने ब्लॅक शर्टमध्ये दिला साथ दिली. हार्दिकने चाहत्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत सोशल मिडीयावर काही फोटो शेअर केला. “नववर्षाच्या स्वागतासाठी मित्रांसह एकत्र डिनर. सर्व विधिवत टेस्ट केलेले आणि सुरक्षित. आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, ”हार्दिकने पोस्ट कॅप्शनमध्ये लिहिले.

विराटची पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

हार्दिकची पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93)

दरम्यान, पहिल्या कसोटीत आठ विकेट्सने अपमानास्पद पराभूत झालेल्या भारताने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात दुसर्‍या कसोटी सामन्यात जोरदार कमबॅक केले. प्रभारी कर्णधाराने शानदार शतकी खेळी केली कारण टीम इंडियाला आठ गडी राखून विजय मिळवून देत मालिका 1-1 अशी बरोबरीत केली. तिसरा कसोटी सामना 7 जानेवारी रोजी सिडनी क्रिकेट मैदानावर (एससीजी) होणार आहे.